अहमदनगर बातम्याआज वानखेडेवर भारत-श्रीलंका भिडणार आमने-सामने

आज वानखेडेवर भारत-श्रीलंका भिडणार आमने-सामने

spot_img
spot_img

भारताचा श्रीलंकेला नमवून उपांत्य फेरी खेळण्याचा निर्धार

मुंबई दि.2 नोव्हेंबर 2023

भारतीय क्रिकेटचे माहेरघर असलेल्या मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियमवर आज भारतीय संघ श्रीलंकेच्या आव्हानाला सामोरे जाईल. यावेळी शानदार विजयासह विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा निर्धार भारतीय संघाचा असेल.

त्याचवेळी विराट कोहलीच्या विक्रमी शतकासाठी ही चाहते आसुसलेले आहेत. कोहलीने या सामन्यात शतक झळकवल्यास तो सचिन तेंडुलकरच्या 49 व्या एक दिवसीय शतकाच्या विश्वविक्रमाची बरोबरी करेल 12 वर्षांपूर्वी भारतीय संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वामध्ये वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेला नमून दुसऱ्यांदा विश्वचषक उंचावला होता. त्यावेळी श्रीलंकेचा संघ तोलामोलाचा होता यंदा या संघाला दुखापतीमुळे प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती जाणवत आहे.असे असले तरी त्यांची फलंदाजी मजबूत असल्याचे या स्पर्धेत वारंवार दिसून आले आहे.

श्रीलंकेची खरी ताकद त्यांची सलामी जोडी असून ही जोडी सातत्याने आक्रमक आणि भक्कम सुरुवात करून देत आहे. सलग सहा सामने जिंकलेल्या भारताला अद्याप कडवी टक्कर मिळालेली नाही सलामीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध आघाडीची फळे अपयशी ठरल्याचा अपवाद वगळता भारताच्या फलंदाजांनी प्रत्येक संघाविरुद्ध सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.गोलंदाजी मध्ये भारतीय संघ वरचढ ठरला आहे लंके विरुद्ध भारतीय संघ संभाव्य विजेता असला तरी,लंकेला गृहीत धरण्याची चूक भारतीय करणार नाहीत.

लेटेस्ट न्यूज़