जमिनीच्या वादातून माने कुटुंबावर जीवघेणा हल्ला
श्रीगोंदा दि 21 एप्रिल 2024
तालुक्यातील लिंपणगाव हद्दीत खरेदी केलेल्या जमिनीचा वाद, या जमिनीत अतिक्रमण करणाऱ्या इसमांकडून होत असुन, जमीन घेणाऱ्या व्यक्तीसह त्याच्या संबंधितांसोबत अनेकदा हुज्जत घालीत जीवघेणा हल्ला करून त्यांचा कायमचा काटा काढण्याचा प्रकार यापूर्वी घडलेला आहे. न्यायालयातील दाव्यानुसार अपरोक्ष लोकांना काही अटी, शर्थी घातल्या असुनही त्यांच्या कार्यगुनात किंचितही फरक पडलेला नसल्याचे काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेने समोर आले आहे.
याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात बाप्पू बाबा माने यांनी फिर्याद दाखल केली असून, याप्रकरणाची संपूर्ण पार्श्वभूमी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले आणि बीट अंमलदार भापकर दादा यांना सांगितली आहे. मात्र, पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात येत नसून, यातील आरोपींना सूचना करण्यासही दिरंगाई होत असल्याने यंत्रनेबाबत साशंका उपस्थित होत असल्याचे दिसून येत आहे.
जमिनीतील अतिक्रमण हटवण्यासाठी मानेंचा कायदेशीर लढा चालू असून, सनदशीर मार्गाने चालु असलेल्या प्रक्रियेला नमुद जमिनीत अतिक्रमण करणारे लोकं विरोध करीत आहेत. तर, या जमिनीत जमीनीचा मालक जरी गेला आणि त्याने विचारपूस केली.. तरी त्यावर हमला करणे, जीवघेणा हल्ला चढवुन जिवे मारण्याचा प्रयत्न, शिवीगाळ करणे, झुंड करुन मारहाण करणे, गाड्या (ट्रॅक्टर) अंगावर घालणे अशी कुकृत्य यापूर्वीच त्यांनी केली असुन, आत्ता जमिनीत पाय ठेवला तर, तलवारीने तोडण्याची भाषा वापरण्यात आल्याचे काल दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत बापू माने (व्यवसायिक) यांनी म्हटले आहे. कोर्टाने यातील आरोपींना अटी शर्तींवर जामीन मंजूर केला असला.. तरी, सदरील लोकांना कायदा सुव्यवस्था आणि न्यायपालिकेचा धाक राहिलेला नसल्याचे या प्रकरणात स्पष्ट होत असल्याचे मानेंकडून बोलले जात होत आहे.
दिनांक १० एप्रिल २०२४ रोजी बाप्पु माने यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, या दिवशी दुपारी २:०० वाजनेच्या पूर्वी माझे शेती गट क्रमांक २३६ मधील जमिनीत मी गेलो असता, सदर जमिनीत दोन ट्रॅक्टर ट्रॉली कांदे भरून व दोन ट्रॉली मोकळ्या उभा असल्याचे निदर्शनास आले. याबाबत चौकशी केली असता, नमुद जमिनी संदर्भात दावा करणारांनीच हे अतिक्रमण केल्याचे समजले.
संतोष भोंडवे यांना याविषयी विचारणा केली.. तर, त्यांनी ती जागा माझी आहे.. त्यात तुझा काय संबंध..? म्हणत अश्लील शिवीगाळ करून, जमिनीत पाय ठेवला… तर, तुझे तलवारीने तुकडे करत.. जीव मारून टाकीन..! असे म्हणाल्याचे माने यांनी फिर्यादित नमुद केले आहे. त्यानंतर त्यांचे नातेवाईक किरण भोंडवे, प्रवीण सोपान कुरुमकर, बापु लक्ष्मण कुरुमकर, सागर भिकाजी भोंडवे, प्रशांत संतोष भोंडवे व इतर दोन महिला घटनास्थळी आल्या.. त्यांना मी ७/१२ आणि कोर्टाचा आदेश समजाऊन सांगण्याचा प्रयत्न केला.. उलट त्यांनी ट्रॉलीतील कांदा माझे शेतात खाली करुन, माझेवर दडपशाही केली.. त्यांना समजाऊन सांगूनही त्यांनी आजपर्यंत केलेले अतिक्रमण आणि टाकलेला कांदा जमिनीतून न काढल्यामुळे तक्रार दाखल केली असल्याचे सांगितले आहे.
मागेही या लोकांकडून शेतीत गेल्याचा राग अनावर होऊन, बापू माने, उदय माने, हनुमंत माने आणि इतर प्रशासकीय पदाधिकारी जे जमीन हद्द, खुणा, निश्चितीसाठी या जमिनीत गेले होते. त्यांच्यावरही यातील इसमांनी प्राणघातक हल्ला करीत ट्रॅक्टर अंगावर घालत.. भाऊ, मुलगा आणि बाप्पुला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता..!
त्यावेळी शासकीय कामात अडथळा करणे, जीवघेणा हल्ला करणे, जमावाने मारहाण करणे.. तसेच, जमिनीच्या मुळ मालकाला त्रास दिल्या संदर्भात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, राईट, जिवे मारण्याचा प्रयत्न.. व ॲट्रोसिटी सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. येवढ्या गुन्ह्यांना अंजाम देणारे सदरील लोकं गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून, यांना न्यायालय, पोलीस प्रशासन, कायदा सुव्यवस्था अशी सनदशीर भाषा मान्य नसुन, आडदांड आणि जमावाने लोकांना लक्ष करत त्यांच्यावर हल्ला करणे अशी असंवेदनशील कृत्य केल्याचे वेगवेगळे अनुभव माने सांगत आहेत.
या प्रकरणात स्थानिक पोलीस प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशाकडे गंभीरतेने लक्ष देऊन, या जमिनीतून अतिक्रमण हटवण्यासाठी भोंडवे यांना कायदेशीर सूचना द्यावी.. अशी अपेक्षा बापु माने आणि त्यांचे संबंधित करीत आहेत. अन्यथा संविधानिक आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे मानेंनी स्पष्ट केले आहे.