जयश्री थोरातांच्या ‘त्या’ वक्तव्याची जिल्हाभर चर्चा
संगमनेर दि.8 मार्च 2024
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात (Jayashree Thorat) या राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. त्यांची संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.’पक्षाची जबाबदारी मिळताच, जयश्री थोरातांनी वडील बाळासाहेब थोरात हे रिटायर्ड झालेले नाहीत.
ते मुख्यमंत्री व्हावेत ही आमची सर्वांचीच इच्छा आहे. पुढे राजकारणात संधी मिळाल्यास नक्की विधानसभा लढवेल’, असे प्रतिक्रिया देत राजकीय चुणूक दाखवून दिली.
जयश्री थोरात या संगमनेर तालुक्यातून वडील बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर गेल्या काही दिवसांपासून राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. संगमनेरमध्ये झालेला मेळावा, महिला मेळावा, पक्षाचे कार्यक्रम, आंदोलनात सहभागी होत होत्या. यातून त्यांनी संगमनेर तालुक्यात महिलांचे संघटनदेखील उभारले आहे.
यातून त्या राजकारणात सक्रिय होणार असे संकेत मिळत होते, परंतु त्याचा मुहूर्त ठरत नव्हता. शेवटी जयश्री थोरात यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. पुढील काळात ते संपूर्ण वेळ राजकारणात सक्रिय असतील, असे सांगितले जात आहे.
जयश्री थोरात म्हणाल्या, “काँग्रेस पक्ष जी जबाबदारी देईल, ती पूर्ण क्षमतेने पार पाडणार आहे. भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल होत आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर यात्राच्या नियोजनाची मोठी जाबाबदारी आहे.
या यात्रेत नगर जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यातून आणि महाराष्ट्रातील युवक काँग्रेस सज्ज आहेत”. ‘राज्यातील राजकीय परिस्थिती पाहिल्यास युवकांचा राजकारणातील मूड वेगळा आहे. देशात आणि राजकारणात बदल घडवण्याची क्षमता युवकांमध्ये आणि ती येत्या निवडणुकीत दिसेल,’ असेदेखील जयश्री थोरात म्हणाल्या.
राज्यासह देशाच्या राजकारणात आमदार बाळासाहेब थोरात हे सक्रिय आहेत. मी पक्षातून काम सुरू केले म्हणजे साहेब रिटायर्ड झाले नाहीत. ते पहिल्यापेक्षा राज्याच्या राजकारणात अधिक सक्रिय आहेत. त्यांच्या इतका संवेदनशील आणि प्रभावशाली राजकीय नेता मी राजकारणात पाहिलेला नाही.
ते मुख्यमंत्री व्हावेत ही आमच्या सर्वांची इच्छा आहे. आम्हाला काँग्रेससाठी चांगले काम करायचे आहे. मात्र, भविष्यात संधी मिळाली, तर नक्कीच विधानसभा निवडणूक लढेल, असेदेखील जयश्री थोरात यांनी सांगितले.
काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे.यावरून काँग्रेसमध्ये काही धुसफूस समोर येत आहे. यावर त्या म्हणाल्या, “शिवानी वडेट्टीवार या चांगल्या काम करीत आहेत. त्यांना संधी दिली तर आणखी चांगले काम करतील. त्यामुळे शिवानी वडेट्टीवार यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली तर आनंदच होईल”.