विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा केला सन्मान
श्रीगोंदा दि.11 मार्च 2024
श्रीगोंदा शहरात जागतिक महिला दिनानिमित्त झाशीची राणी महिला ग्रुप तर्फे विविध क्षेत्रात कर्तृत्ववान ठरलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित महिलांसाठी प्रसिद्ध निवेदक दीपक लांगोरे यांचा खेळ पैठणीचा आयोजन केले होते.त्या मद्दे दिपाली वाळके या पैठणी च्या मानकरी ठरल्या. तर तारा रामचंद्र शिंदे या जेष्ठ अंगणवाडी सेविका पुरस्कार मानकरी ठरल्या. जिल्हा परिषद सदस्य राणी लंके , नगराध्यक्ष शुभांगी पोटे, उपनगराध्यक्ष ज्योती खेडकर व सुनंदाकाकी सदाशिव अण्णा पाचपुते , सौ.मनिषा घनःश्याम शेलार,यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.
८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त श्रीगोंदे शहरात झाशीची राणी ग्रुप च्या सौ राजश्री शिंदे, मिराताई खेडंके , प्रतिभा गांधी, आरती कापसे , सीमा गोरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. श्रीगोंदे तालुक्यातील विविध क्षेत्रात कर्तृत्ववान ठरलेल्या अनेक महिलांना पुरस्कार देण्यात आले.तसेच या कार्यक्रमाप्रसंगी सौ. राणी डांगे, गायत्री ढवळे , सारिका ननवरे,सावंत मॅडम, इंदिरा गांधी विद्या निकेतन श्रीगोंदे फॅक्टरी सुवर्णा पोपट खराडे यांच्यासह 51 महिलांना पुरस्कार दिले
यावेळी महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते खेळ पैठणीचा कार्यक्रमात विजेत्यांना बक्षीस देण्यात आले आहे. तसेच प्रश्नमंजुषा संगीत खुर्ची स्पर्धा व उखाणा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या . या कार्यक्रमाला महिलांनी मोठी गर्दी केली होती .प्रतिभा गांधी, राजश्री शिंदे, मिरा खेंडके अश्विनी जाधव, आरती कापसे, मीनल भिंताडे, शीतल मदने, सीमाताई गोरे यांनी अतिशय चागलं नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ प्रतिभा गांधी यांनी केले, विशाल चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर शेवटी आभार सौ मिरा खेंडके यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल चव्हाण यांनी केले.