राजेश परकाळे माफी मागावी अन्यथा..! मिरा शिंदे
श्रीगोंदा दि.२२ मार्च २०२५
मराठा संघाच्या वतीने काढण्यात आलेल्या राज माता जिजाऊ रथयात्रेचे आगमन बुधवारी दुपारी दोन वाजता श्रीगोंद्यात झाले. राज माता जिजाऊंचा प्रतिमा असलेला रथ शनि चौक येथे आला असता, स्वागतासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख मीराताई शिंदे यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.
यावेळी संभाजी ब्रिगेड पक्ष जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यानी शिवसेना शिंदे गट जिल्हाध्यक्ष मीराताई शिंदे यांच्यासह उपस्थित महिलांचा अपमान केला होता. यासंदर्भात काल शिवसेना शिंदे गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा मीराताई शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत परकाळे यांचा चांगला समाचार घेतला.
यावेळी बोलताना मीराताई शिंदे म्हणाले की,शेख महंमद महाराज यांच्या मंदिर परिसरात रथयात्रा आली असता राज माता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे दर्शन घेण्यासाठी सर्व-धर्मीय महिला उपस्थित होत्या, परंतु त्या ठिकाणी ट्रॅफिक होईल दर्शन घेऊ नका असे राजेश परकाळे यांनी महिलांना सुनावले. त्याच दरम्यान राज माता जिजाऊंच्या दर्शनासाठी काही महिला संत महम्मद महाराज प्रांगणात आल्या. रथासोबत आलेल्या पुरुष व महिला पदाधिकाऱ्यांनी स्वतः मात्र फोटोसेशन केले. त्यावेळेस कुठल्याही ट्राफिकची अडचण निर्माण झाली नाही. पण सर्वसामान्य महिला दर्शनासाठी रथाकडे जात असतानाच परकाळे यांनी माझ्याकडे हात दाखवत तुम्ही महिलांनी रथामध्ये चढायचे नाही असे म्हणून राजमाता जिजाऊ यांच्या दर्शनास जाण्यास मज्जाव केला.
यावेळी त्या ठिकाणी मी उपस्थित होते, तुम्ही असे का बोलता आम्ही येथे तुमचे फोटो सेशन पाहण्यासाठी आलो नाहीत तर राजमाता जिजाऊ यांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत. त्यांच्याबरोबर त्यांच्या संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते परंतु महिलेंचा अपमान होत असताना त्या ठिकाणी कोणालाही निषेध करावासा वाटला नाही. याची खंत वाटते असे त्या म्हणाल्या.
मीराताई शिंदे यांनी या प्रकारानंतर घडलेला हा प्रकार आपल्या फेसबुक अकाउंट वर पोस्ट केला. त्यानंतरही परकाळे यांना कुठलाच पश्चाताप झालेला दिसला नाही. उलट माझ्याबद्दल एक फेसबुक पोस्ट आले आहे याकडे दुर्लक्ष करा अशी पोस्ट त्यांनी व्हायरल केली. यामुळे महिलांसाठी नेहमीच तत्पर असलेल्या मीराताई शिंदे यांनी अशा मगरूर व्यक्ति बद्दल निषेध व्यक्त करत परकाळे यांनी इथे दोन दिवसात आम्हा सर्व महिलांची माफी मागितली नाही तर परकाळे यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
बुधवारची सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून याची सध्या तालुका भर जोरदार चर्चा सुरू आहे.
चौकट
संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटना व संभाजी ब्रिगेड पक्ष यांचा एकमेकांशी कसलाही संबंध नाही जिजाऊ रथ यात्रेचे स्वागत हे जिजाऊंच्या लेकिन कडून होणे अपेक्षित असताना या कार्यक्रम दरम्यान राजमाता जिजाऊंच्या लेकींनाच दर्शन घेण्यास अडवले चा प्रकार झाल्याचा समजला, ही बाब गंभीर असून महिलांच्या स्वातंत्र्याला गदा आणणारी या घटनेचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर निषेध करतो. अशी भावना संभाजी ब्रिगेड संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे यांनी व्यक्त केली.