ताज्या बातम्याश्री छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयातील विद्यार्थिनीने घेतले कराटे चे प्रशिक्षण

श्री छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयातील विद्यार्थिनीने घेतले कराटे चे प्रशिक्षण

spot_img
spot_img

श्री छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयातील विद्यार्थिनीने घेतले कराटे चे प्रशिक्षण

श्रीगोंदा दि.२२ फेब्रुवारी २०२५

श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालाया मध्ये दिनांक २१ फेब्रुवारी रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित “निर्भया कन्या अभियान”अंतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय श्रीगोंदा येथील महाविद्यालयीन युवतींना संरक्षण प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी यांनी केले.कार्यक्रमासाठी कराटे प्रशिक्षक म्हणून श्री.जयेश आनंदकर यांनी मार्गदर्शन केले.

 

सरांनी प्रथम टीम मधिल कराटे क्लासच्या मुलींचे काही प्रात्यक्षिके दाखविल्यानंतर मार्गदर्शनाला सुरुवात केली. काही बेसिक स्वसंरक्षण स्टेपचे प्रात्यक्षिक दाखवून सर्व महाविद्यालयीन युवतींकडून ते करवून घेतले.

 

कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ .सतीशचंद्र सूर्यवंशी, डॉ.आर.शिर्के यांच्यासह सर्व प्राध्यापक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक विभाग प्रमुख डॉ. भोस यांनी केले.

प्रशिक्षणासाठी संजय आनंदकर स्पोट्र्स अकॅडमीच्या जयेश आनंदकर यांच्यासह शरयू लोंढे, अंकिता सोळंके, वेदश्री ढवळे, प्रांजल गायकवाड, ज्ञानेश्वरी खेडकर, कार्तिकी निंबाळकर, स्वराली फडताळे, प्रणिती महारणवर, प्रांजल गाडेकर, संस्कृती शेळके, श्रावणी कोकरे, मयुरी गांगर्डे, समीक्षा गायकवाड, जेनी साठे, श्रेया आळेकर, शरण्या पवार, भार्गवी शेलार, स्नेहल गवांदे, पलक पाचपुते, भार्गवी सोनवणे,गायत्री भुजबळ या खेळाडूंनी कराटे प्रात्यक्षिक सादर केले.

लेटेस्ट न्यूज़