ताज्या बातम्याकर्जत एमआयडीसीची औद्योगिक महामंडळाच्या पथकाने केली पाहणी...

कर्जत एमआयडीसीची औद्योगिक महामंडळाच्या पथकाने केली पाहणी…

spot_img
spot_img

औद्योगिक वसाहतीसाठी विकास महामंडळाकडून हालचालींना वेग

कर्जत दि.21 डिसेंबर 2023

कर्जत नियोजित एमआयडीसी जागेच्या पाहणीचा अहवाल शासनाला आठ दिवसा मध्ये सादर करण्याचे उद्योगमंत्री श्री उदय सामंत आणि आ प्रा .राम शिंदे यांच्या अधिवेशनादरम्यान झालेल्या बैठकीत ठरले होते . त्याप्रमाणे मागील रविवारी दि १७/१२/२०२३ कर्जत येथे आ प्रा राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य यांचे प्रादेशिक अधिकारी, प्रमुख कार्यकर्ते, नागरिक यांच्या समवेत बैठक झाली होती आणि त्यामध्ये प्रामुख्याने ६ जागांची मागणी नागरिकांमधून आलेली होती ..
या जागांची पाहणी करण्यासाठी आज ओंद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी आज दि.२२/१२/२०२३ रोजी कर्जत तालुक्या मध्ये आले होते . प्रथम त्यांनी कोंभळी, थेरगाव, रवळगाव या जागेची पाहणी केली त्यानंतर वालवड, सुपा या जागेची पाहणी करून नंतर पथक कर्जत पठारवाडी, अळसुंदा, देऊळवाडी सिद्धटेक या जागांची पाहणी करत रवाना झाले . या जागांव्यतिरिक्त ही आणखी एखादी सुयोग्य जागा असेल तर त्याचाही या औद्योगिक वसाहतीसाठी विचार केला जाणार आहे .

नियोजित औद्योगिक वसाहतीच्या जागेचा अहवाल शासनास त्वरीत सादर होणार आहे त्यामुळे पुढील कामास आता वेग येणार असून लवकरच जागेवर शिक्कामोर्तब होऊन औद्योगिक वसाहती साठी मंजुरी घेऊन हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागेल . शेतकऱ्यांनी नियोजित जागेची खरेदी विक्री करू नये असे आवाहन आ राम शिंदे साहेब यांनी केले आहे असे भाजप तालुकाध्यक्ष श्री शेखर खरमरे यांनी सांगितले .

पाहणी पथका बरोबर कोंभळी येथे श्री काकासाहेब तापकीर, श्री शेखर खरमरे ( तालुकाध्यक्ष, भाजपा कर्जत ), श्री स्वप्निल तोरडमल, श्री गणेश पालवे, श्री रमेश अनारसे, श्री जिजाबापू अनारसे, श्री पंडीत अनारसे उपस्थित होते .

लेटेस्ट न्यूज़