ताज्या बातम्या'त्या'जागेच्या चौकशीबाबत खोमणे करणार प्राणातिक उपोषण

‘त्या’जागेच्या चौकशीबाबत खोमणे करणार प्राणातिक उपोषण

spot_img
spot_img

शेवगाव येथील बिहाणी किराना दुकान जागेची चौकशी करण्याबाबत प्राणातिक उपोषण

शेवगाव दि 18 जानेवारी 2024

वगाव तालुक्यातील एरंडगाव भागवत येथील प्रवीण खोमणे शेवगाव शहरातील मुख्य पेठेतील शनी मंदिर जवळील नगर परिषद मालकीच्या जागेतील बिहाणी किराणा दुकान दोन माजली इमारत ही नगर परिषद मालकीची असून अनेक वर्षापासून एकाच मालकाला भाडे तत्वावर दिली असून शनी भक्तासाठी भक्त निवास किंवा शहरातील पेठेमध्ये वाहनाची गर्दी लक्ष्यात घेता, या जागेमध्ये भाविक भक्तांसाठी व येणाऱ्या नागरिकासाठी वाहन पार्किंग करण्यात यावी, 2)तसेच श्रीराम सबलोक ही व्यक्ति मयत असून या व्यक्तीचे नावे नगरपरिषदेने त्याच व्यक्तीच्या नावे करार चालू ठेवला असून त्या जागेचा फिर लिलाव करण्यात यावा त्या जागेची योग्य ती चौकशी करण्यात यावी या जागेचे फेर लिलाव करून गरजू व्यक्तींना देण्यात यावी याकरिता दि.18/1/2024 या तारखेपासून प्राणातिक उपोषणाला बसत आहे.

या काळा मध्ये माझ्या व माझ्या कुटुंबाचे सदस्याच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास उदा. रस्ते अपघात, मारहाण, खोटे-नाटे गुन्हे या सारखे प्रकार घडल्यास सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची राहील.

तसेच या जागा धनदांडग्या व्यापाऱ्याकडे असल्याने हे लोक प्रशासनाला वेठीस धरण्यासाठी शेवगाव शहर तसेच बाजारपेठ बंद ठेवून दडपशाही करण्याचा प्रयत्न करण्यात होऊ शकतो असे निवेदनात म्हटले आहे .

या अगोदरही खोमणे यांनी दि. 22 व 23 डिसेंबर रोजी दोन दिवसाचे प्राणांतिक उपोषण तहसीलदार यांच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित केले परंतु कुठलीही कारवाई न झाल्याने पुन्हा उपोषण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

हे उपोषण तहसील कार्यालयासमोर करणार असल्याचे खोमणे यांनी सांगितले निवेदनाच्या प्रती.मा.तहसीलदार साहेब शेवगाव,मा.पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर,मा.पोलीस निरीक्षक साहेब शेवगाव,मा. नगररचना विभाग अहमदनगर,मा. मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, नगर परिषद शेवगाव, यांना दिलेले आहेत

लेटेस्ट न्यूज़