ताज्या बातम्यामंथन परीक्षेत कु.दिशा प्रशांत गडाखचा राज्यात सातवा तर जिल्ह्यात दुसरा क्रमांक

मंथन परीक्षेत कु.दिशा प्रशांत गडाखचा राज्यात सातवा तर जिल्ह्यात दुसरा क्रमांक

spot_img
spot_img

मंथन परीक्षेत आदर्श विद्यामंदिर सोनईचा डंका

सोनई दि.29 एप्रिल 2024

मंथन वेल्फेअर फाउंडेशन यांच्यावतीने घेण्यात आलेल्या मंथन जनरल नॉलेज एक्झामिनेशन मध्ये आज पानसवाडी (सोनई) येथील श्री प्रशांत जालिंदर गडाख (सर) यांची कन्या कु दिशा प्रशांत गडाख ईयत्ता 1 ली हिचा नुकत्याच झालेल्या मंथन सामान्यज्ञान परिक्षेत महाराष्ट्र राज्यात सातवा तर अहमदनगर जिल्ह्यात दुसरा क्रमांक आला.

याबद्दल दिशा हिचा मंथन वेलफेअर फाऊंडेशनच्या वतीने श्री सुधीर काकटकर (इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञ जी एम आर टी),मा डॉ. भुषण निकम,मा श्री दासु वैद्य,मा श्री आशिषजी दहातोंडे,मा श्री वैभव पडवळ,मा अमृता धोंगडे (मिसेस मुख्यमंत्री फेम अभिनेत्री) मा महेश देशमुख यांच्या सर्वांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.

या यशाबद्दल तिचे संस्थेचे सचिव मा रविराज तुकाराम पाटील गडाख. संस्थेच्या अध्यक्षा सौ.जयश्रीताई रविराज पा गडाख. व आदर्श विद्यामंदिर सोनई शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक तसेच पानसवाडी येथील सर्व ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

लेटेस्ट न्यूज़