ताज्या बातम्याअल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याबद्दल तरुणास जन्मठेप

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याबद्दल तरुणास जन्मठेप

spot_img
spot_img

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याबद्दल तरुणास जन्मठेप

श्रीगोंदा दि.२२ फेब्रुवारी २०२५

अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी तरुणास श्रीगोंदे येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी जन्मठेपेची शिक्षा व १० हजार रुपये दंड केला. दंड न भरल्यास ६ महिने साधी कारावासाची शिक्षा सुनावली. ऋषीकेश भिमराव उर्फ पिमंराव वाळुंजकर (वय २३, रा. जवळके, कर ता. जामखेड) असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे.

 

जामखेड तालुक्यातील १३ वर्षीय मुलगी ८ जानेवारी २०२४ रोजी शाळेत जात असताना, आरोपी ऋषीकेशने तिला शाळेत सोडतो, असे सांगून चारचाकी गाडीत बसण्यास सांगितले. त्यास मुलीने नकार दिला असता, जीवे मारण्याची धमकी देत आरोपीने तिला बळजबरीने गाडीत बसवून नान्नज येथील बंद ढाब्यावर नेऊन अत्याचार केला. नंतर २९ जानेवारी २०२४ रोजी पुन्हा बंद ढाब्यावर अत्याचार केला. २० फेब्रुवारी २०२४ रोजी नान्नज येथील जंगलात, तर १० मार्च २०२४ रोजी मुलीच्या घरामागे अत्याचार केला. याबाबत कोणाला काही सांगितल्यास, मुलगी व तिच्या वडिलांना मारुन टाकण्याची धमकी दिली. याबाबत पीडित मुलीच्या आईने खर्डा पोलिस ठाण्यात पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. सहायक पोलिस निरीक्षक विजय झंजाड यांनी या गुन्ह्याचा तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने १० साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदार व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस जन्मठेप व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील पुष्पा कापसे-गायके यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी नामदेव रोहकले, हेडकॉन्स्टेबल आशा खामकर व फिर्यादी तर्फे अँड. एस. के. पाटील यांनी सहकार्य केले.

लेटेस्ट न्यूज़