अहमदनगर बातम्याश्रीगोंद्यातील त्या खून प्रकरणातील आरोपीस जन्मठेप

श्रीगोंद्यातील त्या खून प्रकरणातील आरोपीस जन्मठेप

spot_img
spot_img

श्रीगोंद्यातील त्या बहुचर्चीत खून प्रकरणातील आरोपीस जन्मठेप

कुऱ्हाडीने केले होते सपासप वार, खून्यास न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

किरकोळ कारणातून कुऱ्हाडीने मारहाण करुन खून करणाऱ्या आरोपीला श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधिश मुजीब एस. शेख यांच्या समोर हा खटला चालला. राजू बबन शिरवाळे (रा. म्हातारपिंप्री) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

२० जुलै २०२० रोजी ही घटना घडली होती. म्हातारपिंप्री येथील नरेंद्र सयाची वाबळे असे खून झालेल्या इसमाचे नाव होते. २० जुलैला सायंकाळी सात वाजेच्या सुमारास आपल्या शेतातील पाण्याची पाईपलाईन कोणी फोडली याबाबत जाब विचारण्यासाठी आरोपी राजू वाबळे आला. म्हातारपिंप्री येथील सुरसिंग वाबळे यांच्या शेतात वाद विकोपाला जाऊन आरोपी राजू याने नरेंद्र वाबळे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातला. खून केल्यानंतर आरोपी स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला होता. मयताचा मुलगा विजय वाबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरिक्षक एस. एस. गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. न्यायालयाने १९ साक्षीदारांची तपासणी केल्यानंतर न्यायाधीश शेख यांनी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मुळ फिर्यादीकडून अँड. सुमित पाटील यांनी काम पाहीले.

लेटेस्ट न्यूज़