‘नगरीपंच’च्या वृत्ताची दखल : प्रशासनाने बोलावली सेतु चालकांची बैठक
श्रीगोंदा दि.20 ऑगस्ट 2024
शासकीय प्रमाणपत्रांसाठी अव्वाच्यासव्वा दर आकारले जात असल्याच्या प्रकारावर ‘नगरीपंच’ने प्रशासनाचे लक्ष्य वेधले होते. ‘सेतू नव्हे, लुटीचा हेतू’ या मथळ्याखाली दोन दिवसांपूर्वी वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. श्रीगोंदा शहरातील सर्व महा ई-सेवा केंद्र चालकांची महसूल प्रशासनाने मंगळवार (ता.20) तहसील कार्यालयात बैठक बोलावली आहे.
सध्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या प्रवेशासाठी विद्यार्थी-पालकांची लगबग सुरू आहे. तंत्रशिक्षण, कौशल्य अभ्यासक्रमांसह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी कागदपत्रांची आवश्यकता असते. या सर्वच कागदपत्रांसाठी शासनाने एक ठराविक रक्कम घेण्याचा शासन निर्णय जाहीर केलेला आहे, परंतु अनेक ई-सेवा केंद्रचालक शासन निर्णयाला पायदळी तुडवत मनमानी रक्कम वसूल करत आहेत.
‘महा ई-सेवा’ केंद्र चालकांना शासनाने दर ठरवून दिले आहेत. परंतू, शासनाच्या उद्देशाला ई-सेवा चालकांकडून हरताळ फासली जात आहे. प्रमाणपत्रांसाठी विद्यार्थी व त्यांच्या पालकांना 2000 रुपयांपर्यंत किमत मोजावी लागत असल्याची परिस्थिती आहे. केंद्रचालकांकडून नागरिकांची लूट केली जात असल्याचे वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. प्रशासनाने ‘नगरीपंच’च्या वृत्ताची गंभीर दखल घेत सेतू केंद्र चालकांची बैठक बोलावली आहे.
महसूल विभाग व सेतूचालकांच्या बैठकीत नागरिकांच्या हिताचा निर्णय व्हावा व तालुक्यातील अनधिकृत सेतू यांच्यावर कडक कारवाई करावी नाहीतर हे भिजत घोंगड वर्षानुवर्ष असंच राहिलेलं दिसतंय