मुख्यमंत्री एकनाथ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
श्रीगोंदा दि.10 फेब्रुवारी 2024
कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एकनाथ जी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त अहमदनगर जिल्हा महिला आघाडी व श्रीगोंदा तालुका यांच्या वतीने श्रीगोंदा शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा प्रमुख मिराताई शिंदे यांच्या पुढाकाराने शहरातील राम मंदिर येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे रांगोळी तुन हुबेहूब चित्र प्रतिभा इथापे यांनी साकारले तर श्रुतिका सकट हिने शेतकऱ्या सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे चित्र काढले.पूनम फिरोदिया व पल्लवी सिद्ध यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.तर श्रीगोंदा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष ज्योती ताई खेडकर,नगरसेविका सीमाताई गोरे,राजश्रीताई शिंदे, मिराताई खेडके,ताडे ताई,शीतल ताई लांडे यांच्या हस्ते बक्षीस ट्रॉफी देण्यात आली.
सकाळी शिवसेना पदाधिकारी यांनी श्रीगोंदा जिल्हा प्राथमिक शाळेत जाऊन लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.
या साठी शिवसेना महिला आघाडी च्या जिल्हा प्रमुख मिराताई शिंदे, उपजिल्हा प्रमुख संतोष शिंदे, तालुका प्रमुख नंदकुमार ताडे,शहराध्यक्ष नितीन गायकवाड, युवा सेना शहराध्यक्ष संदीप भोईटे, शांतबाई चौगुले रघुनाथ शिंदे आदि सह पदाधिकारी, उपस्थित होते