ताज्या बातम्याअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले आमदार आशुतोष काळे

अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले आमदार आशुतोष काळे

spot_img
spot_img

अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले आमदार आशुतोष काळे

कोपरगाव :दि.2 ऑगस्ट 2024

रस्त्यावर अपघात घडल्यानंतर त्या अपघाताबद्दल कळकळ व्यक्त करून पुढे जाणारे अनेकजण असतात त्यावेळी वाटते की, माणुसकी संपली की, काय. मात्र अपघात झाल्यानंतर त्या जखमी व्यक्तीला आपल्या स्वत:च्या चारचाकी वाहनातून उपचारासाठी हॉस्पिटलला पाठवून स्वत: मात्र दुचाकीवर आपल्या नियोजित कार्यक्रमस्थळी जाणारे लोकप्रतिनिधी मात्र खूप दुर्मिळ असतात.

 

असाच काहीसा प्रसंग आ.आशुतोष काळे यांच्या बाबतीत घडला आहे.

आपल्या नियोजित कार्यक्रमांना वेळेत पोहोचण्यासाठी आ.आशुतोष काळे सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास पोहेगाव येथे जात असतांना त्यांना चांदेकसारे परिसरात राष्ट्रीय महामार्ग-160 वर कार व मोटार सायकलचा अपघात होवून एक व्यक्ती रस्त्याच्या खाली जवळपास पाच ते सात फुटावर असह्य वेदनेने पडलेला दिसला.त्यावेळी त्यांनी जवळ जावून माहिती घेतली असता रुग्णवाहिका येण्यास काहीसा उशीर असल्याचे त्यांना जमलेल्या लोकांनी सांगितले.त्यावेळी त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या गाडीतून त्या व्यक्तीला कोपरगाव येथे खाजगी हॉस्पिटलला पाठविले व त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांना देखील भ्रमणध्वनीवरून संवाद साधत अपघाताची माहिती देवून तातडीने उपचार करण्याच्या सूचना केल्या. व कार्यकर्त्याच्या दुचाकीवरून आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले. जखमी व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु झाल्यानंतर त्या व्यक्तीचे नातेवाईक देखील हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर सबंधित व्यक्ती कोपरगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल अरुण सुपेकर असल्याची माहिती मिळाली असून त्यांच्या नातेवाईकांनी व कोपरगाव पोलीस प्रशासनाने वेळेत मदत केल्यामुळे आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले असता आ. आशुतोष काळे यांनी ते माझे कर्तव्यच होते असे सांगितले. मितभाषी व्यक्तिमत्व असलेले आ.आशुतोष काळे नेहमीच सर्व समाजाशी एकरूप राहून लहान-थोरांशी नेहमीच मनमोकळेपनाणे वागतात. त्यामुळे दोनच दिवसांपूर्वी कार्यक्रमानिमित्त मतदार संघातील पूर्व भागातील वारी गावात जात असतांना शाळेला उशीर होईल या भीतीमुळे एका शाळकरी मुलीने चक्क आ.आशुतोष काळे यांच्या गाडीला हात करून गाडी थांबवत त्यांच्या गाडीतून शाळा गाठली. त्यावेळी सुजाण पालकाच्या नात्याने आ. आशुतोष काळे यांनी त्या शाळकरी मुलीला अनोळखी गाडीत न बसण्याचा सल्ला देखील दिला.

 

वारसा जरी मोठा, पाय मात्र जमिनीवर 

 

काळे परिवाराचे सामाजिक योगदान खूप मोठे आहे त्याप्रमाणे समाजात त्यांची लोकप्रियता देखील तेवढीच मोठी आहे. अनेकवेळा असे प्रसंग घडले आहेत की, अपघात झाल्यानंतर जखमी व्यक्तीला मदत करण्यासाठी लवकर पुढे कोणी येत नाही त्यामुळे जखमी व्यक्तीला वेळेत उपचार न मिळाल्यामुळे त्या व्यक्तीला वेळप्रसंगी आपला जीव देखील गमवावा लागला आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेत एवढा मोठा राजकीय वारसा असतांना देखील आ.आशुतोष काळे यांनी अपघातग्रस्त व्यक्तीला केलेली मदत वारसा जरी मोठा असला तरी पाय मात्र जमिनीवरच असल्याचे त्यांच्या या कृतीतून सिद्ध होत आहे.

लेटेस्ट न्यूज़