महाराष्ट्रात आज चौथ्या टप्प्यातील मतदान
श्रीगोंदा दि.13 मे 2024
आमदार बबनराव पाचपुते यांनी सहकुटुंब श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी या आपल्या गावी अहमदनगर (अहिल्यानगर) दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.
आमदार बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे जनता विद्यालयात मतदानाचा हक्क बजावला यावेळी आमदार पाचपुते यांच्या समवेत पत्नी डॉ प्रतिभाताई पाचपुते, विक्रम पाचपुते (युवा मोर्चा राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र), श्री प्रतापसिंह पाचपुते आणि त्यांच्या सर्व समर्थकांसह त्यांनी मतदान केले.
अहमदनगर (अहिल्यानगर) दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजप विरूध्द राष्ट्रवादी (शप) यांच्यात कडवी झुंज आहे. भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारासाठी आमदार बबनराव पाचपुते यांचे सुपुत्र विक्रम पाचपुते व प्रतापसिंह पाचपुते यांनी प्रचंड मेहनत घेतली. ते गेल्या महिन्याभरापासून मतदारसंघात तळ ठोकून होते. मतदारसंघातील गावा- गावात जाऊन विक्रम पाचपुते यांनी तगडी प्रचार मोहिम राबवली. त्यांच्या अचूक नियोजनामुळे विरोधकांचे धाबे दणाणल्याचे चित्र प्रचारकाळात दिसून येत होते.
आज 13 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात अहमदनगर (अहिल्यानगर) दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडत आहे. आमदार बबनराव पाचपुते यांनी काष्टी या आपल्या गावी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर आमदार पाचपुते यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पाचपुते म्हणाले की, महाराष्ट्रात आज चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू झाले आहे.
अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघामधील काष्टी ता श्रीगोंदा येथील जनता विद्यालयात माझा मतदानाचा हक्क बजावला आहे. सर्वांनी मतदान करून आपल्या देशाची लोकशाही समृद्ध व सुदृढ करावी असे अवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.