वडाळी तलावातील कृषीपंपाची चौकशी न केल्यास तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण: सौ.मिनाक्षीताई सकट
श्रीगोंदा दि.7 नोव्हेंबर 2023
श्रीगोंदा तालुक्यातील वडाळी येथील तलावातील अनधिकृत कृषीपंपांना ‘MSEB ने कनेक्शन दिले कसे असा सवाल सुरोडी गावच्या सरपंच सौ.मीनाक्षीताई सकट यांनी केला. याबाबत त्यांनी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कर्जत-श्रीगोंदा यांना निवेदनही दिले आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,तलावात अनाधिकृत अतिक्रमण धारकाना वीज कनेक्शन कशी दिली त्याची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याबद्दल त्यांनी विनंतीही केली आहे, त्याचबरोबर ज्यांना वीज कनेक्शन दिले आहे ‘त्या’ अतिक्रमण धारकांना त्यांची स्वमालकीची जागा नसताना गेली 10 ते 15 वर्षापासून सतत मोटारीने तलावातून पणी उपसा सुरू आहे. तलावातील पाण्याचा वापर पिण्यासाठी होण्याऐवजी शेतीसाठी केला जात असल्यामुळे गावकऱ्यांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. माणसांबरोबर जनावरांच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे.सूरोडी गावात नवीन पाणी योजना मंजूर झाली आहे,पण हे अतिक्रमण न हटवल्यास पाणी अडचण कायम राहील असेही त्या म्हणाल्या.
त्याच बरोबर MSEBने अनाधिकृत अतिक्रमण धारकांना वीज कनेक्शन कोणत्या धर्तीवर दिले त्याची चौकशी करण्यात यावी. काय यामध्ये MSEBचा गैरवापर कोणी करत आहे का ? असा आरोप देखील सकट यांनी निवेदनाद्वारे केला आहे.
संबंधित वडाळी तलावातील विजेचे कनेक्शन लवकरात लवकर बंद करण्यात यावे अन्यथा 19-10-2023 रोजी.तहसीलदारांना निवेदन देऊन आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा मीनाक्षी ताई सकट यांनी दिला आहे.