अहमदनगर बातम्यासुरोडी येथील तलावाचे अतिक्रमण न हटवल्यास एक तारखेपासून आमरण उपोषण : सौ.मीनाक्षी...

सुरोडी येथील तलावाचे अतिक्रमण न हटवल्यास एक तारखेपासून आमरण उपोषण : सौ.मीनाक्षी सकट

spot_img
spot_img

अतिक्रमणामुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात

श्रीगोंदा : सुरोडी भागातील शेतकऱ्यांसाठी लाभदायक
ठरणाऱ्या तलावावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले असून. त्यामुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे तलावाचे तातडीने सर्व्हेक्षण करुन अतिक्रमण हटविने गरजेचे बनले आहे. अन्यथा येणाऱ्या काळात माणसासह जनावरांसाठी पाण्याचा प्रश्न निर्माण होईल. सुरोडी परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी तलाव आहे. या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे परिसरातील लोकांना व जनावरांना पिण्यासाठी पाण्याचा वापर होत नसुन तलावातील पाण्याचा शेतीसाठी काही लोक वापर करत आहेत.या तलावामध्ये सातत्याने अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणात मोटारी टाकून शेततळे भरून शेतीला पाणी दिले जात आहे. याबाबत सरपंच सौ. मिनाक्षी ताई सकट यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन अतिक्रमण हटवण्याबाबत विनंती केली आहे. ३०/१० तारखेपर्यंत हे अतिक्रमण हटवले गेले नाही तर १/११/२०२३ पासून गावातील पाण्याचा प्रश्न सुटेपर्यंत आमरण उपोषण करण्याचा इशारा सरपंच सौ.मीनाक्षीताई सकट यांनी दिला आहे.

लेटेस्ट न्यूज़