ताज्या बातम्या'सत्कार सोहळे नको', मला काम करू द्या - धनंजय मुंडे

‘सत्कार सोहळे नको’, मला काम करू द्या – धनंजय मुंडे

spot_img
spot_img

बीड दि.09 ऑक्टोबर 2023

पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्यात येताच, स्वागत नाकारून धनंजय मुंडे यांनी साधला आष्टी ते बीड विविध गावातील नागरिकांशी संवाद

‘हारतुरे आणि सत्कार सोहळे नको’ मला काम करू द्या असे म्हणत, गावागावातील सत्कार टाळत फक्त निवेदने स्वीकारीत बिडकडे प्रवास केला. नेहमी हार, तुरे, पुष्पगुच्छ आदींनी भरलेली धनंजय मुंडे यांच्या गाडीची डिक्की आज मात्र निवेदनांच्या थप्पीने भरलेली दिसत होती!

धनंजय मुंडे यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर त्यांच्यावर कृषिमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली, मात्र बीड जिल्हा वासीयांना खरी प्रतीक्षा होती, ती मुंडे बीडच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर आज प्रथमच ते येत होते. अहमदनगर येथील ‘शब्दगंध’ या साहित्य संमेलनाचे उद्घाटन करून बीडकडे निघाले असता, गावोगावी लोक रस्त्यावर उतरून धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी उभे होते. धनंजय मुंडे यांनी गाडीतून खाली उतरून स्वागतासाठी फुलांनी भरलेले जेसीबी बाजूला करायला लावले, तुमचे हार तुरे नको मला कामं करू द्या कामांची निवेदने द्या, असे म्हणत हार, तुरे व सत्कार नाकारले.

बीड जिल्ह्याच्या हद्दीवर दौला वडगाव, चिंचपूर, धामणगाव, अमळनेर, म्हसोबची वाडी, हातोला, जवळागिरी, गणेशगड, लिंबा देवी फाटा अशा अनेक ठिकाणी त्यांनी सत्कार नाकारून केवळ निवेदने स्वीकारली.

यावेळी सोबत आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे काका, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. शिवाजी राऊत, आष्टीचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी तसेच कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

लेटेस्ट न्यूज़