Wednesday, December 18, 2024

खेळाचे मैदान कोणतेही असू देत,पण जिंकण्यासाठी प्रयत्न करतो तोच खरा खेळाडू :आ.राजळे

आमदार राजळेंचा क्रिकेटच्या मैदानातून विरोधकांना सूचक इशारा…

पाथर्डी दि.१३ जानेवारी २०२४

नगर जिल्ह्यातील राजकारणात शांत, संयमी, वेळवर प्रहार आणि ताकद दाखवणारे नेतृत्व म्हणजे, भाजप आमदार मोनिका राजळे यांची ओळख आहे. पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघात त्यांच्या मार्गदर्शनाखाली नमो क्रिकेट स्पर्धा झाल्या.

या स्पर्धेदरम्यान त्यांनी मैदानावर येत फलंदाजी केली. ही फटकेबाजी क्रिकेटच्या मैदानात असली, तरी त्यातून त्यांच्या राजकीय विरोधकांना धसका घेतला आहे. कोणत्याही परिस्थितीत विरोधकांना राजकीय आखाड्यात जोरदार प्रत्युत्तर मिळणार, असा सूचक इशारा आमदार मोनिक राजळे यांनी मैदानावरून दिला आहे.

 

लोकसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरू होत असली, तरी विधानसभा निवडणुकांची चाचपणी देखील होत आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. गेल्या काही दिवसांपासून पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघात आमदार राजळेविरुद्ध सर्व असे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपचे पदाधिकारी यांनी देखील आमदार राजळे यांच्याविरुद्ध दंड थोपाटले आहेत. यातून पक्षातंर्गत संघर्ष वाढल्याचे दिसते. या सर्व राजकीय कुरघोड्यांवर मात करण्याची सध्या तरी आमदार राजळे यशस्वी ठरताना दिसत आहे. या संघर्षातून आणि कुरघोड्यांमधून आमदार राजळे या अधिक कणखर होत असल्याचे जाणकरांचे म्हणणे आहे.

आमदार राजळे यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी-शेवगाव मतदारसंघात नमो चषक क्रिकेट स्पर्धा झाली. या स्पर्धेत आमदार राजळेयांचा वेगळाच अंदाज दिसून आला. पेहरावापासून ते त्यांचा मैदानावर आक्रमकपणे असलेला सहभाग, सर्व काही सांगून जात होता. यातच त्यांनी मैदानावर फलंदाजी केली. या ‘फलंदाजीतून’ त्यांनी विरोधकांना देखील सूचक इशारा दिल्याचे बोलले जात आहे. खेळाचे मैदान कोणतेही असू देत. मैदान राजकीय असो किंवा क्रिकेटचे, खेळात हार-जीत चालूच असते. पण जिंकण्यासाठी प्रयत्न करतो, तोच खरा खेळाडू, असे आमदार राजळे यांनी यावेळी म्हटले.

या स्पर्धेत 40 संघ सहभागी झाले होते. आमदार राजळे यांनी ग्रामीण संघाचे, तर अभय आव्हाड हे शहर संघाचे कर्णधार होते. भाजपचे नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, विवेक नाईक, डाॅ. मृत्युजंय गर्जे, नंदकुमार शेळके, विष्णुपंत अकोलकर, माणिक खेडकर, संजय बडे, नामदेव लबडे, शुभम गाडे हे पदाधिकाऱ्यांनी मैदानात उतरत क्रिकेट खेळले.

आणखी महत्वाच्या बातम्या