अहमदनगर बातम्यासुजय विखे खासदारकीचे उमेदवार असल्याचे संकेत

सुजय विखे खासदारकीचे उमेदवार असल्याचे संकेत

spot_img
spot_img

देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी तर डॉ.सुजय विखे यांना पुन्हा लोकसभेत पाठविण्याचा निर्धार करा – प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

*मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी जीवाचे रान करू – खा.डॉ.सुजय विखे पाटील

आपली पुढची पिढी ही घडवायाची असेल तर देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना विराजमान करावयाचे आहे तसेच आपल्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर डॉ.सुजय विखे यांना पुन्हा लोकसभेत पाठविण्याचा निर्धार आपण सर्वांनी या कार्यशाळेत करावा असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

अहमदनगर येथील भाजप पक्षाच्या महविजय 2024 लोकसभा प्रवास या कार्यक्रमात कार्यकर्ता कार्यशाळेत ते बोलत होते.

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून खा.डॉ.सुजय विखे पाटील, आ. प्रा.राम शिंदे,बबनराव पाचपुते, मोनिका ताई राजळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले,भाजपचे महामंत्री विजय चौधरी, यांची प्रमुख उपस्थिती होती.

बावनकुळे यांनी या कार्य शाळेत मार्गदर्शन करताना कार्यकर्त्यांनी आता झटून कामाला लागावे असे सांगून आपल्या कडे वेळ कमी असून आपल्या देशाला महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी घरोघरी जावून नरेंद्र मोदी यांच्या कार्यकर्तृत्वा बद्दल सांगावे लागेल. आपली पुढची पिढी घडविण्याचे ही आपल्याल खूप मोठी संधी मिळणार आहे. या संधीचे आपण आताच सोनेकरून घरोघरी जावून त्याचा प्रसार आणि प्रचार करावा. मोदीजी यांनी गरीब कल्याणा करिता राबविलेल्या योजना बद्दल जनजागृती करावी. मोदीजी आता विश्वाचे नेते झाले असून
जी -20 या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या यशस्वी आयोजनातून आपण सर्वजण जाणतो असे सांगताना विरोधक याही आयोजन बद्दल टीका करत आहेत. या आंतरराष्ट्रीय परिषदेतून देशाला बायोफ्युल मिळाले असून पुढील.आठ ते दहा वर्षात सत्तर – ऐंशी पैसे प्रती किलोमिटर या दराने आपण आपली गाडी चालवू शकू एवढेच नाही तर शेतकऱ्यांच्या शेतातील पाचट, पाला पाचोळा यापासून ही गॅस निर्मिती करता येणार आहे. आज आपले पंतप्रधान एवढ्या गोष्टींचा विचार करत असताना आपलं एक मत हे देशाला सर्वोभोमत्वा कडे नेवु शकते याचा आपण विचार करावा असे सांगितले.
सरल ऍप आपण सर्वांनी डाऊनलोड करून घेतल्यास मोदीजींनी नऊ वर्षात केलेले विकास कामे, गरीब कल्याण योजना यासह त्यांची भाषणे त्यांच्या जाहीर सभा, महाराष्ट्र शासनाच्या योजना या सर्व बाबी आपण पहावयास भेटतील. त्यामुळे इतरांना सांगण्यासाठी देखील तुम्हाला यातून बरीच माहिती मिळेल असे त्यांनी यावेळी सांगितले.
आपल्या देशाच्या उज्वल भविष्यासाठी आपण सर्वांनी तेरा महिने तीन तास काम करावे असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

याप्रसंगी खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या भाषणातून बोलताना सांगितले की देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांनाच आपल्या सर्वांना विराजमान करावयाचे असून याकरिता जीवाचे रान करण्याची गरज आहे. लोकसभा निवडणुकी करिता पक्ष जी जवाबदारी देईल ती आपण पूर्ण करणार असल्याचे यावेळी सांगताना प्रदेशाध्यक्ष यांच्या पायगुंणामुळे या भागात चांगला पाऊस झाला, पावसा अभावी या परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. आता त्या परिस्थितीत सुधारणा झाली असून शेतकरी समाधानी झाला आहे असे सांगितले.
जिल्ह्यात पक्षाच्या कामकाजात आम्ही सर्व एकमेकांना सांभाळत असून आपण आम्हाला सांभाळावे अशी विनंती यावेळी केली.
अहमदनगर जिल्ह्यात गरीब कल्याणासाठी अनेक योजना अत्यंत प्रभावीपणे राबविल्या आहेत त्यामुळे याभागात मोदींना मानणारा मोठा वर्ग असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी शिवाजीराव कर्डिले प्रा.राम शिंदे यांची समयोचीत भाषणे झाली.
या कार्य शाळेस भाजपचे पदाधिकारी,विधानसभा प्रमुख, बूथ प्रमुख यांच्यासह कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

लेटेस्ट न्यूज़