Thursday, December 19, 2024

एन दिवाळीत आ.रोहित पवारांचा राम शिंदे यांना ‘दे धक्का’

बूथ कार्यकर्ते गणेश डोंगरे यांच्यासह १०० कार्यकर्त्यांच्या हाती तुतारी

जामखेड.दि.2 नोव्हेंबर 2024

जामखेड तालुक्यातील डोणगावमधील भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांनी आमदार राम शिंदे यांना धक्का देत आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

भाजपचे डोणगाव येथील बूथ कार्यकर्ते गणेश डोंगरे यांच्यासह १०० कार्यकर्त्यांनी आज आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी हाती घेतली. ‘आमदार रोहित पवार हे मतदारसंघातील युवकांच्या हाताला काम मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून एमआयडीसी मंजुरीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी वेळोवेळी आंदोलने केली तसेच विधिमंडळातही यासंदर्भात आवाज उठवला मात्र आमदार राम शिंदे यात खोडा घालून कर्जत- जामखेडच्या युवांच्या भविष्याशी खेळत आहेत. तसेच राम शिंदे यांचे जातीपातीचे राजकारण आणि कार्यपद्धतीला कंटाळून आपण राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याची भावना कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली आणि यापुढे आमदार रोहित पवार यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याचा निर्धार या युवकांनी बोलून दाखवला”.

आणखी महत्वाच्या बातम्या