ताज्या बातम्याशिवजयंती निमित्त आनंदकर स्पोर्ट्स अकॅडमीच्या स्पर्धकांनी केली पदकांची लयलूट

शिवजयंती निमित्त आनंदकर स्पोर्ट्स अकॅडमीच्या स्पर्धकांनी केली पदकांची लयलूट

spot_img
spot_img

स्पर्धेत शहरातील तब्बल 200 खेळाडूंनी नोंदवला सहभाग

श्रीगोंदा दि.20 फेब्रुवारी 2024

संजय आनंदकर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित इंटर क्लास मार्शल आर्ट स्पर्धा नुकतीच संपन्न झाली.सदर स्पर्धेमध्ये श्रीगोंदा शहरातील तब्बल २०० खेळाडूंनी सहभाग घेत उत्कृष्ट मार्शल खेळांचे प्रदर्शन करून पदकांची लयलूट करीत घवघवीत यश संपादन केले.

स्पर्धेचे उद्घाटन श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सतीशचंद्र सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले.स्पर्धेसाठी ग्रँडमास्टर संजय आनंदकर, महाविद्यालयाचे फिजीकल डायरेक्टर चोरमले सर, क्रीडाशिक्षक गिरमकर सर, पत्रकार गायत्री ढवळे मॅडम, स्वयंसिद्धा तालुकाप्रमुख विद्या आनंदकर मॅडम यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रसंगी “खेलो इंडिया” वुमेन्स किक बॉक्सिंग लीगमधील पदक विजेत्या खेळाडू शर्वरी गोलांडे, साक्षी गांजूरे, अक्षरा बळे, सृष्टी काळे, अंतरा बळे यांच्यासह झारखंड येथील राष्ट्रीय स्पर्धेमधील पदक विजेते खेळाडू प्रज्वल ढवळे आणि नाहीद पठाण यांना सन्मानित करण्यात आले.यशस्वी खेळाडूंना महाराष्ट्र राज्य किक बॉक्सिंग संघाचे कोच सिद्धेश आनंदकर, मास्टर जयेश आनंदकर, अतुल जाधव, ऋषिकेश घोडेकर , स्वप्नील गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अकॅडमी चे सिनियर ब्लॅक बेल्ट खेळाडूंनी परिश्रम घेतले.

चौकट

१९९२ पासून आनंदकर सर श्रीगोंदा शहरासह तालुक्यामध्ये मार्शल आर्टचे उत्कृष्ट प्रशिक्षण देत असल्याचे सांगून खेलो इंडिया सारख्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत संजय आनंदकर स्पोर्ट्स अकॅडमीचे श्रीगोंद्यातील खेळाडू शहराचे नाव देशपातळीवर उंचावत असल्याबद्दल डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी यांनी कौतुक केले.

लेटेस्ट न्यूज़