आधी फोटोसेशन, मग महिलांना दर्शनासाठी मज्जाव शिवसेनेची रणरागिनी कडाडली..?
श्रीगोंदा दि.२१ मार्च २०२५
मराठा संघाच्या वतीने काढण्यात आलेल्या राज माता जिजाऊ रथयात्रेचे आगमन बुधवारी दुपारी दोन वाजता श्रीगोंद्यात झाले. राज माता जिजाऊंचा प्रतिमा असलेला रथ शनि चौक येथे आला असता,जिजाऊ ब्रिगेडच्या महिला पदाधिकारी व शिवसेना जिल्हाप्रमुख मीराताई शिंदे यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला स्वागतासाठी उपस्थित होत्या.
शेख महंमद महाराज यांच्या मंदिर परिसरात रथयात्रा आली असता राज माता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे दर्शन घेण्यासाठी सर्व-धर्मीय महिला उपस्थित होत्या, परंतु त्या ठिकाणी ट्रॅफिक होईल दर्शन घेऊ नका असे एका पुरुष पदाधिकाऱ्यांनी महिलांना सुनावले. त्यामूळे महिला राज माता जिजाऊंच्या दर्शनासाठी संत मंहम्मद महाराज प्रांगणात आल्या. रथासोबत आलेल्या पुरुष पदाधिकाऱ्यांनी स्वतः फोटोसेशन केले. त्यावेळेस कुठल्याही ट्राफिकची अडचण निर्माण झाली नाही. पण सर्वसामान्य महिला दर्शनासाठी रथाकडे जात असतानाच एका पुरुष पदाधिकाऱ्यांनी महिलांना रथामध्ये चढण्यास मज्जाव केला.
यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या शिवसेना-शिंदे गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा मीराताई शिंदे यांनी आपल्या प्रखर शैलीत “त्या” पुरुष पदाधिकाऱ्याला जाब विचारला,त्या बोलताना म्हणाल्या की “आम्ही महिला भर उन्हात राज माता जिजाऊंच्या दर्शन घेण्यासाठी आलो आहोत तुमचे फोटो सेशन पाहण्यासाठी नाही, तुम्ही आम्हाला दर्शन घेण्यापासून आडवू शकत नाहीत”.व त्यानंतर महिलांनी राज माता जिजाऊंचे दर्शन घेतले.
ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून याची सध्या तालुका भर जोरदार चर्चा सुरू आहे.
चौकट
एकीकडे राज माता जिजाऊंची रथयात्रा काढायची, आणि दुसरीकडे महिलांचा अपमान करायचा ही खेद जनक गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया नगरीपंचशी बोलताना शिवसेना शिंदे गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा मीराताई शिंदे यांनी दिली.