श्री काळभैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त बनपिंपरी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
श्रीगोंदा दि.1 डिसेंबर 2023
श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंपरी येथे सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सुरुवात 29 नोव्हेंबर पासून करण्यात आली आहे. या सप्ताहाचे वर्ष 27 वे सुरू आहे.श्री काळभैरवनाथ महाराज यांच्या जयंतीनिमित्त या सप्ताहाचे आयोजन करण्यात येते.
या सप्ताह प्रसंगी सकाळी काकडा, विष्णू सहस्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण,गाथा भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन, जागर असा दैनंदिन कार्यक्रम सुरू आहे.
माजी.आमदार अरुणकाका जगताप, मा.आमदार संग्रामभैय्या जगताप, जिल्हा परिषद सदस्य सचिनभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनातून सर्व गावकरी मंडळी या सप्ताहाचे आयोजन करत असतात . या सप्ताह निमित्त महाराष्ट्रातील विविध थोर महाराज मंडळींच्या कीर्तनाचे आयोजन असते. या सप्ताह निमित्त मोठ्या प्रमाणात अन्नदान चालू ठेवले जाते.
माजी.आमदार अरुणकाका जगताप, मा.आमदार संग्रामभैय्या जगताप, जिल्हा परिषद सदस्य सचिनभाऊ जगताप, सरपंच गौतम पठारे व सर्व गावकरी मंडळी यांच्या वतीने सोहळ्याचा लाभ घ्यावा अशी विनंती पंचक्रोशीतील ग्रामस्थांना करण्यात आली आहे.