द युवा.ग्रामीण पत्रकार संघांचा पुरस्कार सोहळा संपन्न
अहमदनगर दि.27 नोव्हेंबर 2023
द युवा ग्रामीण पत्रकार संघ व सत्यजित महाराष्ट्र मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2023 मंगळवारी 21 रोजी पार पडला या कार्यक्रमांमध्ये बोलताना पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले की पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून पत्रकार समाजासाठी दिशादर्शक असतो आज पत्रकार संघाने राबवलेल्या उपक्रमात पुरस्काराती यांचा केलेला सन्मान म्हणजे त्यांच्या कार्याची पावती असून पत्रकारांनी राबवलेला उपक्रम स्तुत्य आहे.
त्याचबरोबर जात-पात घेऊन जगण्यापेक्षा माणूस म्हणून जगण्यात खरा आनंद आहे माणसाने माणूस म्हणून जगायला शिकलं की आयुष्याचा आनंद मिळतो असे मत पवार यांनी व्यक्त केले
द युवा ग्रामीण पत्रकार संघातर्फे घेण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यामध्ये उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार हरिहर गर्जे व रोहित वाळके यांना देण्यात आला
त्याचबरोबर सामाजिक क्षेत्र ,राजकीय क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्रात देखील पुरस्कार देऊन मान्यवरांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष पोपटराव पवार हे होते
कार्यक्रमावेळी बोलताना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव म्हणाले की प्रत्येक क्षेत्रात संघर्ष करावा लागतो संघर्ष करून आपले नाव लौकिक मिळवुन जे यश मिळते ती खरी आपल्या यशाची पावती असते छोट्या छोट्या गोष्टींमधून प्रत्येकाने काहीतरी शिकायला हवे त्याचबरोबर पोलीस हा समाजाचा मित्र असून नागरिकांनी त्यांच्या व्यथा पोलिसांपर्यंत पोहोचल्या तर पोलिसांना काम करणे अधिक सुलभ होईल त्या माध्यमातून कोतवाली पोलीस ठाणे अंतर्गत विविध उपक्रम राबवून पोलीस हा सर्वसामान्य जनतेचा आधार आहे असा विश्वास आम्ही जनतेच्या मनात तयार करत आहोत त्यासाठी पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य त्या उपाययोजना सुरू आहेत यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून समीर मणियार तसेच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, राज्य मराठी पत्रकार संघाचे मीडिया जिल्हाध्यक्ष आफताब शेख, प्रा संभाजी पवार, बाबासाहेब बोडके, आदि पाहुणे उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्याम कांबळे यांनी केले व कार्यक्रमाचे आभार पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख यांनी मानले