ताज्या बातम्यापंकजा मुंडे, जरांगे पाटील एकाच व्यासपीठावर, कार्यकर्त्यांचा स्टेजवरच गोंधळ

पंकजा मुंडे, जरांगे पाटील एकाच व्यासपीठावर, कार्यकर्त्यांचा स्टेजवरच गोंधळ

spot_img
spot_img

 सप्ताहाच्या व्यासपीठावर मनोज जरांगे व पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर 

बीड दि.28 एप्रिल 2024

 

बीडमधून मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे या एकाच व्यासपीठावर आल्या . त्यामुळे स्टेजवर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आणि गोंधळ उडाला.

 

स्टेजवरील गोंधळ थांबवण्यासाठी शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. बीडच्या गेवराई तालुक्यातील शिरसमार्ग येथे नारायण गडाच्या नारळी सप्ताहाच्या व्यासपीठावर मनोज जरांगे पाटील आणि पंकजा मुंडे हे एकाच व्यासपीठावर आले यावेळी त्यांची भेट घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केल्यानं हा गोंधळ उडाला.

 

मनोज जरांगे पाटील आणि पंकजा मुंडे यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी स्टेजवर गर्दी केली. त्यामुळे गोंधळ उडाला. शेवटी व्यासपीठावरील गोंधळ कमी करण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. यावेळी पंकजा मुंडे यांनी स्वतः हातामध्ये माईक घेऊन कार्यकर्त्यांना स्टेजवरून खाली जाण्यास सांगितलं. तर पोलिसांनी स्टेजवर जमलेल्या गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना स्टेजवरून खाली उतरवले. अचानक व्यासपीठावर गर्दी वाढल्याने आयोजकांची चांगलीच तारांबळ उडाली.

 

दरम्यान यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिर्डी येथे एकदा विनंती केली होती , तुमचा माणूस इथे आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करत आहे, खोट्या केसेस दाखल होत आहे, हे थांबवा. मराठ्यांना सग्यासोयऱ्यातून आरक्षण द्या, ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी त्यांना दोनदा केली. मी पण क्षत्रिय मराठा आहे, आता पुन्हा विनंती करणार नाही. मराठ्यांना 6 जूनपर्यंत आरक्षण दिले नाही तर विधानसभेच्या आखाड्यात उतरणार असून महाराष्ट्रातील सर्व 288 जागा लढवणार, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

लेटेस्ट न्यूज़