बँक ऑफ महाराष्ट्र श्रीगोंदा शाखेचे नूतन वास्तुत स्थलांतर
श्रीगोंदा दि.21 जुलै 2024
बैंक ऑफ महाराष्ट्र, श्रीगोंदा शाखा 2012 पासून शहरात कार्यरत आहे. बँकेची श्रीगोंदा शाखा आता सर्व सोयी सुविधांनी युक्त जाधव इस्टेट, भापकर हॉस्पीटल जवळील नवीन वास्तूत स्थलांतरित झाली आहे. या नवीन वास्तूतील कामकाजाचा प्रारंभ दि. १५ जुलै 2024 पासून सुरु झाला आहे.
बँकेच्या नूतन जागेच्या स्थलांतर कार्यक्रमा निमित्त प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी राणी फराटे, श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच प्राचार्य डॉ. सतिशचंद्र सुर्यवंशी, मुख्याधिकारी पुषगंधा भगत हे उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्राचार्य सुर्यवंशी म्हणाले की, देशभक्ती करण्यासाठी सिमेवर जाण्याची गरज नाही तर घेतलेले कर्ज वेळेत भरा हीच खरी देशभक्ती आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की खरोखरच बँक तुम्हाला कर्ज दयायला तयार असते , पण आपण हप्ते जर वेळेत भरले तर आपली शाखा मोठी होईल आणि आपल्याला आपल्या कुवतीनुसार कर्ज उपलब्ध होईल.
यापुढे गटविकास अधिकारी राणी फराटे यांनी बोलताना सांगितले की, महाराष्ट्र बँकेच्या सुविधा उत्तम आहेत आणि या बँकेकडून खातेदारांना चांगल्या प्रकार सेवा दिली जाते. आज या शाखेचं छोट्या वास्तुतून -मोठ्या जागेत स्थलांतर झालं यापुढेही यापेक्षा मोठ्या इमारतीत ही बँक व्हावी अशी सदिच्छा व्यक्त केली.
त्याचबरोबर मुख्याधिकारी भगत मैडम यांनी आपल्या कर्मचायांची सर्व अकाउंट याच बँकेत उघडावेत अशा सूचना देणार व जास्तीत जास्त सुविधांचा आमच्या कर्मचान्यांना लाभ द्यावा अशी विनंती शाखाधिकारी यांचेकडे केली व शाखेच्या नवीन वास्तुप्रसंगी शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर बैंक ऑफ महाराष्ट्र अहमदनगर येथील डेप्युटी झोनल मैनेजर मा.वर्षा थुल मैडम यांनी बँकेच्या अनेक योजनेची माहिती देत आम्ही बँकेमार्फत अनेक योजना राबवतो व त्यामध्ये श्रीगोंदा शाखा नेहमीच अग्रेसर असते. शाखेचे कर्ज व ठेवीचे प्रमाण सारखेच आहे.जर कर्जदाराने वेळेत परत फेड केली तर अधिक लोकांना त्यांच्या फायदा घेता येईल असे त्यांनी सांगितले. आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी आमच्याकडे जास्तीत जास्त अकाउंट ओपन करावेत व बँकेच्या विमा योजनेचा फायदा घ्यावा अशी व्यासपीठावरील मान्यवरांकडे विनंती केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाखाधिकारी सुनील मांडे व सूत्रसंचालन प्रा. योगेश मांडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी विभागीय कार्यालयाचे अधिकारी श्री.अमर रामटेके यांची मोलाची मदत झाली. सदर कार्यक्रमास बँकेचे दिनेश देशपांडे, सुमित औगड, शेखर आनंदकर,शिरीष म्हस्के, मुबारक तांबोळी, केशव भोरे, अतुल चिरके, सोमनाथ मेरगळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाखाधिकारी पाटील सर यांनी केले.