भोसे गावात श्री संत बाळूमामा प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण
भोसे दि.21 जून 2024
भोसे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अविनाश चव्हाण यांच्या वाढदिवसानिम्मित सर्व सामाजिक संघटना कर्जत आणि श्री संत बाळूमामा प्रतिष्ठान भोसे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच भोसे गावातील सामाजिक कार्यासाठी पुर्ण वेळ देत आपल्या कामाची चुणूक दाखवत भावी सरपंच पदाकडे वाटचाल करणारे अभ्यासु नेतृत्व शहाजी बयाजी खराडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भोसे ग्रामपंचायत कार्यालयालगत श्री संत बाळूमामा मंदिर परिसरात सालाबादप्रमाणे यावर्षीही वृक्षलागवड करण्यात आली.
यावेळी प्रमुख मान्यवर कोसेगव्हाणचे सरपंच भीमराव नलगे यांच्या हस्ते वृक्षरोपनची सुरूवात करण्यात आली. यावेळी कर्जत तालुका दुध संघाचे संचालक दादासाहेब खराडे यांनी वृक्षलागवडीचे महत्त्व पटवून देताना जागतिक तापमानवाढ समस्येचे निराकरण करण्यासाठी तसेच निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षरोपण करणे आणि त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी माजी सरपंच नीलकंठ खराडे, जेष्ठ नागरीक लालासाहेब क्षिरसागर,जालिंदर खराडे, बबन क्षिरसागर, वारकरी संप्रदायाची धुरा आपल्या खांद्यावर यशस्वीपणे वाहणारे बापु बयाजी खराडे, दत्तात्रय देवराव खराडे, तसेच युवा सामाजिक कार्यकर्ते गणेश रामराव खराडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सर्व सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी तसेच पत्रकार वृक्षप्रेमी मुन्ना पठाण यांच्या पुढाकाराने करण्यात आले.