अहमदनगर बातम्यामराठा आरक्षणासाठी "या"गावात राजकीय नेत्यांना बंदी व मतदानावर बहिष्कार!

मराठा आरक्षणासाठी “या”गावात राजकीय नेत्यांना बंदी व मतदानावर बहिष्कार!

spot_img
spot_img

श्रीगोंदा: दि२८ऑक्टोबर:मराठा आरक्षणासाठी पुढाऱ्यांना गावबंदीचा वाणवा

श्रीगोंदा: मराठा आरक्षणासाठी पुढाऱ्यांना गावबंदीचा वणवा अहमदनगर जिल्ह्यातही पोहोचला असुन राजकीय नेत्यांना श्रीगोंदा तालुक्यातील ‘निंबवी’ या गावात येण्यास बंदी घातली असून येणाऱ्या सर्वच निवडणुकीतील मतदानावरही बहिष्कार टाकल्याने धाबे दणाणले आहेत.

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) पुढाऱ्यांना गावबंदीचा वणवा अहमदनगर जिल्ह्यातही पोहोचला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटल्यानंतर गावागावात नेत्यांना गाव बंदी केली जात आहे. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील निंबवी गावात नेत्यांना नुसती बंदी घातली नाही, तर येणाऱ्या सर्वच मतदानावर बहिष्कार टाकल्याने धाबे दणाणले आहेत.

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात पुढाऱ्यांना गावबंदी, काळे झेंडे दाखवण्यात येत आहेत. आत्महत्येसारखा दुर्दैवी प्रकारही घडत आहे. त्यामुळे दिवसागणिक परिस्थिती चिघळत चालली आहे.

त्यामुळे निंबवी ग्रामपंचायतच्या वतीने मराठा आरक्षण मिळेपर्यंत सर्व पक्षीय राजकीय पुढाऱ्यांना गाव बंदी घालण्याचां व मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ठराव घेऊन घेण्यात आला. या ठरावामुळे तालुक्यात मराठा समाजाच्या वतीने या ग्रामपंचायतीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

लेटेस्ट न्यूज़