निंबेनादुर दि.9फेब्रुवारी 2025
शेवगाव तालुक्यातील ताजनापुर येथील श्री दत्त आश्रमात आश्रमामध्ये शुक्रवार दिनांक २१ फेब्रुवारी ते शनिवार दिनांक २२ फेब्रुवारी या कालावधीत १२ ज्योतिर्लिंग, श्री महालक्ष्मी, श्री भवानी माता, श्री सप्तश्रृंगी माता, श्री रेणुका माता, कार्तिक स्वामी, भैरवनाथ आणि गजानन महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे. भाविक-भक्तांच्या सहकार्याने साकारलेल्या या आश्रमामध्ये वे.शा.स. दामु देवा सारपे आणि रामु देवा मुळे यांच्या वेदपठणातून हा सोहळा संपन्न होईल.
शनिवार दिनांक २२ रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत प्रवचन होईल आणि त्यानंतर महाप्रसाद होईल. तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, अशी नम्र विनंती आयोजकांनी केली आहे.
बुधवार दिनांक २६ रोजी महाशिवरात्री निमित्त सकाळी ९ ते ११ या वेळेत कीर्तन होईल. तसेच, श्री. नानासाहेब भाऊसाहेब बर्डे आणि श्री. सोन्याबापू भाऊसाहेब वाघ यांच्या वतीने खिचडी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्थळ: श्री दत्त आश्रम, ताजनापूर, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर.
आयोजक: संपूर्ण शेवगाव तालुका व परिवार.