अहमदनगर बातम्याबाजार समितीच्या आवारातच सभापती तनपुरे यांचे उपोषण

बाजार समितीच्या आवारातच सभापती तनपुरे यांचे उपोषण

spot_img
spot_img

मराठा आरक्षणाला पाठिंबा म्हणून सभापती तनपुरे यांनी केले एकदिवशीय लाक्षणिक उपोषण

राहुरी दि.1 नोव्हेंबर 2023

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणास पाठिंबा म्हणून राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्यासह संचालक मंडळाने आज राहुरी बाजार समिती आवारात लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.

बाजार समिती आवारात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर अरुण तनपुरे व संचालक मंडळाने उपोषण सुरू केले आहे.

यावेळी तहसीलदार चंद्रजीत रजपूत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी युवा नेते हर्ष तनपुरे, सर्व संचालक व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व मराठा समाज बांधव तसेच आडत व्यापारी उपस्थित होते.

लेटेस्ट न्यूज़