Thursday, December 19, 2024

लंके समर्थक अजित दादा गटात सामील, लंकेंच्या विरोधातंच शड्डू ठोकणार..?

पारनेरमध्ये अजित पवारांनी टाकला डाव; मातब्बरांचा पक्षात प्रवेश

पारनेर दि.15 ऑक्टोबर 2024

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागताच राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून मातब्बर नेत्यांच्या फोडाफोडीला वेग आला आहे. पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील मातब्बर नेत्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे होऊ घातलेली विधानसभा निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यावर महायुतीचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विशेष लक्ष घातले आहे. नगर-पारनेर मतदारसंघात जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, बांधकाम समितीचे माजी सभापती काशिनाथ दाते, जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी, शिवाजीराव गुजर यांनी अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी आमदार नरहरी झिरवळ, अशोक सावंत, जिल्हा बँकेचे संचालक प्रशात गायकवाड, सचिन वराळ पाटील उपस्थित होते.

पारनेरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातल्याने पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीकडून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी सौ. राणीताई लंके यांची उमेदवारी अंतीम मानली जात आहे. लंके यांच्या विरोधात महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या