Monday, December 23, 2024

प्रा.राजू म्हेत्रे यांना पीएचडी पदवी बहाल..!

प्रा.राजू म्हेत्रे यांना पीएचडी पदवी बहाल..!

श्रीगोंदा दि.13 जुलै 2024

शैक्षणिक ,सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आणि योगविद्या पारंगत व्यक्तिमत्व प्रा.राजू देविदास म्हेत्रे यांनी किशोरवयीन शालेय विद्यार्थ्यांच्या शारीरिक हालचालींचा स्तर व आहाराचा विश्लेषणात्मक अभ्यास या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे या विद्यापीठास पीएचडी प्रबंध डॉ.दीपक शेंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला. त्याचे मौखिक सादरीकरण दि. ९जुलै रोजी झाले. एकूणच प्रबंध व मौखिक परीक्षा उत्तम झाल्याबद्दल विद्यापीठाने त्यांना पीएचडी पदवी बहाल केली.

किशोरवयीन शालेय विद्यार्थ्यांच्या शारीरिक हालचालींचा स्तर व आहाराचा विश्लेषणात्मक अभ्यास हा विषय आणि याच विषयावर मिळालेली पदवी या मुळे माझी जबाबदारी वाढलीअसुन किशोरवयीन मुलांच्या कलात्मक , गुणवत्तेतर भविष्यासाठी अहोरात्र कार्यरत राहणार असल्याची प्रतिक्रिया प्रा.राजू म्हेत्रे यांनी नगरीपंचशी बोलताना व्यक्त केली.

पदवी बहाल झाले बद्दल संस्थेचे सचिव डॉक्टर महेश गोलेकर, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष विजयसिंह गोलेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चंद्रसेन आवारे , डॉक्टर राजेंद्रकुमार देवकाते, संपादक मेजर भिमराव उल्हारे आदी मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.

आणखी महत्वाच्या बातम्या