Sunday, December 22, 2024

कर्जत-जामखेडच्या जनतेसाठी आ.प्रा.राम शिंदे यांची ‘जागल्या’ची भूमिका….

‘आपला तो आपला’ म्हणत लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून भावना व्यक्त

कर्जत दि.26 नोव्हेंबर 2023

कुकडी कालव्याचे आवर्तन कुकडी कालवा सल्लागार समितीच्या दि .२०/१०/२०२३ च्या बैठकीत झालेल्या चर्चा व नियोजना प्रमाणे १ डिसेंबर रोजी पाणी ठरल्याप्रमाणे सोडावे यासाठी आ.प्रा राम शिंदे साहेब यांनी पत्र दिले होते.

कर्जत तालुक्या मध्ये अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने भूजल पातळी खालावली आहे . कुकडी लाभ क्षेत्रातील बंधारे व पाझर तलाव यामध्ये पिकांना पाणी देण्यासाठी पाणी उपलब्ध नाही . पाण्याअभावी पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे . चारा पिके, फळबाग यांनाही पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे . त्यामुळे दि .२०/१०/२०२३ च्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार रब्बी आवर्तन १ ते १५ डिसेंबर २०२३ रोजी सोडण्याचे नियोजन मंजूर आहे परंतु कुकडी डावा कालवा लाभ क्षेत्रातील शेतकर्यांची पाणी सोडण्याची आग्रही मागणी लक्षात घेऊन आता रब्बी आवर्तनाला विलंब न करता ते १ डिसेंबर रोजीच सोडण्यात यावे असे पत्र कुकडी सल्लागार समितीस दिले आहे . त्याप्रमाणे नियोजन होईल …. कुकडी डावा कालव्याचे आवर्तन १ डिसेंबर ला सोडण्या मुळे कर्जत जामखेड मधील लाभ क्षेत्रातील शेती पिकांना, चारा पिकांना व फळबागांना दिलासा मिळणार आहे . वेळेवर पाणी मिळण्यामुळे शेतकर्‍याचे अर्थकारणावर ही सकारात्मक परिणाम होईल . आ.प्रा राम शिंदे हे कर्जत जामखेडच्या जनतेसाठी खऱ्या अर्थाने “जागल्या ” ची महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहेत .अशी भावना लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांची आहे अशी माहिती भाजपा तालुकाध्यक्ष श्री शेखर खरमरे यांनी प्रसिद्धी माध्यमात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे .

आणखी महत्वाच्या बातम्या