ताज्या बातम्याकाही दिवसांनी संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम होईल :राधाकृष्ण विखे

काही दिवसांनी संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम होईल :राधाकृष्ण विखे

spot_img
spot_img

पालकमंत्री विखेंच्या हस्ते भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ..

शिर्डी 9 डिसेंबर 2023

संजय राऊत यांचीच नैतिकता तपासण्याची आवश्यकता आहे. त्यांची वक्तव्य खालच्या पातळीची असून त्यांनी थोडं तारतम्य ठेवून वागावं. अन्यथा त्यांच्ं कर्तुत्व त्याच पातळीवर जाऊन जाहीर करावं लागेल.

सत्ता गेल्याचं एव्हढं वैफल्य बरोबर नाही. या वैफल्यातून काही दिवसांनी संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम होईल, असं टीकास्त्र महसूलंत्री राधाकृष्ण विखे पाटील संजय राऊत यांच्यावर केलं आहे. संजय राऊत यांनी राज्याचं सरकार तीन घाशीराम कोतवाल चालवत असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे विखेंनी त्यांच्यावर आज निशाना साधला.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शिर्डी मतदारसघांतील साकुरी गावात विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. संकल्प यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. नऊ वर्षात विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचे महत्त्वाचं काम करण्यात आलं आहे. सर्व समाज घटकांपर्यंत योजना नेण्याचे काम आम्ही करत असून अहमदनगर जिल्ह्यात संकल्प यात्रेच्या स्वागतासाठी प्रचंड उत्साह मिळत असल्याचा दावा यावेळी त्यांनी केला. समृध्दी शेतकरी निळवंडे पाण्यावरून सुरू असलेल्या रास्तारोकोवर बोलताना ते म्हणाले, सिन्नर तालुक्यातील लाभक्षेत्रातील गावांना पाणी मिळावे यासाठी तेथील लोप्रतिनिधींचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व भागात पाणी पोहचवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. नुकतेच जलपूजनही झाले. मात्र काही भाग पाण्यापासून वंचित राहिला असेल तर चौकशी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Lalit Patil Narcotics Case: अमली पदार्थ तस्करीप्रकरणी मोठी अपडेट, ललित पाटीलसह चार जणांना १० दिवसांची पोलीस कोठडी
संजय राऊत यांनी राज्याच सरकार तीन घाशीराम कोतवाल चालवत आहेत. त्यामुळे त्यांना नैतिकतेवर बोलण्याचा अधिकार नाही. यांच्या सरकारमधील सर्वच मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असून खटले सुरू आहेत आणि हे लोकांकडे बोट दाखवतायेत. असा घणाघात प्रसार माध्यमांशी बोलताना केला होता. त्याचा विखे पाटलांनी जोरदार समाचार घेतला. संजय राऊतांच्या आरोपांकडे लक्ष देण्याची गरज नाही. पक्षाची भूमिका जनतेसमोर आहे. संजय राऊतांच्या प्रश्नांना उत्तरे द्यायला आम्ही बांधील नसल्याचे ते म्हणाले.

तसेच संजय राऊत यांचीच नैतिकता तपासण्याची आवश्यकता आहे. त्यांची वक्तव्य खालच्या पातळीची असून त्यांनी थोडं तारतम्य ठेवून वागावं, बोलावं. अन्यथा त्यांचे कर्तुत्व त्याच पातळीवर जाऊन जाहीर करावं लागेल. सत्ता गेल्याचे एव्हढे वैफल्य बरोबर नाही. या वैफल्यातून काही दिवसांनी संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम होईल, अशी टीका त्यांनी केली आहे.

लेटेस्ट न्यूज़