ताज्या बातम्याजनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून पाथर्डी येथे 'रेकॉर्ड ब्रेक' गर्दी

जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून पाथर्डी येथे ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दी

spot_img
spot_img

खासदार डॉ. सुजय विखेंच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान!

पाथर्डी दि.7 मार्च 2024

काल जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून महिला दिनाच्या निमित्ताने पाथर्डी येथे आयोजित करण्यात आलेला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि सांस्कृतिक महोत्सव २०२४ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

पाथर्डी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात हा भव्य कार्यक्रम संपन्न झाला असून यावेळी महिला भगिनींनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाथर्डी येथे पाहायला मिळाली. सदर कार्यक्रमात विविध क्षेत्रांमध्ये आपल्या बहुमूल्य योगदानाने समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सन्मानित करण्यात आलेल्या सर्व महिला भगिनींचे खासदार विखेंनी मनापासून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देत त्यांच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या कार्याला सदिच्छा दिल्या. तसेच उपस्थित महिला भगिनींना देखील या सन्मानित करण्यात आलेल्या महिला भगिनिंकडून प्रेरणा घेत वाटचाल करण्याचे आवाहन केले.

या सांस्कृतिक महोत्सवात महिलांचे मनोरंजन करण्यासाठी विविध कार्यक्रम राबविण्यात आले. भव्य लकी ड्रॉ, पैठणी आणि बरच काही.. या थीम अंतर्गत विविध स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या नृत्याने उपस्थित सर्वच महिलांची मने जिंकत या सोहळ्याचा उत्साह अधिक वाढवला.

पाथर्डी मध्ये या अगोदर देखील बरेच कार्यक्रम झाले परंतु कोणत्याच कार्यक्रमाला इतक्या प्रचंड प्रमाणात महिलांची गर्दी उसळली नव्हती. ‘न भूतो न भविष्यती’ असा हा सोहळा पार पडला. जणू काही महिलांसाठी ही एक विशेष पर्वणीच होती असा भास सगळ्यांनाच झाला. अगदी आनंदमय वातावरणात सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी होत आपल्या धावपळीच्या आयुष्यातून वेळ काढत हा क्षण अविस्मरणीय केला. दरम्यान जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची संपूर्ण तालुक्यात चर्चा होत आहे. उत्कृष्ट नियोजन आणि महिलांचे संघटन काय असते हे खासदार सुजय विखे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाकडे पाहून सर्वांनाच समजले. यावेळी आमदार मोनिका राजळे आणि रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्ष धनश्री विखे पाटील देखील उपस्थित होत्या.

या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा फुंदे, पाथर्डीत रुग्ण सेवा सुरू करणाऱ्या प्रथम महिला डॉ. सुरेखा लोखंडे, युवा कीर्तनकार ह.भ.प. वैष्णवी मुखेकर, पैठणी विणकामाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार मिळवून देणाऱ्या शितल टेके, महिला उद्योजक उमामहेश्वरी बजाज, समाजहित जोपासणाऱ्या मा. नगरसेविका सुरेखा गोरे, शैक्षणिक कार्यात महत्वाचे योगदान देणाऱ्या मुख्याध्यापिका विजया चोरमले, महिला उद्योजक मिरा बडे, महिला उद्योजक सिंधू आहेर, महिला उद्योजक पार्वती शिंदे, डॉ. आयेशा पठाण, आरोग्यमाता केंद्राच्या माध्यमातून रुग्ण सेवा करणाऱ्या समाजसेविका शिला जाधव आदी कर्तृत्ववान महिलांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.

चौकट

सोनाली कुलकर्णी यांनी कार्यक्रमादरम्यान दादांबद्दल काढले गौरवोद्गार…

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी खासदार सुजय दादांबद्दल म्हणाल्या की, एरवी नेते मंडळी पुढच्या रांगेत सोफ्यावर बसून कार्यक्रमाचा आनंद घेतात. परंतु दादांचे तसे नाही, कुठलाही बडेजावपणा न करता कार्यक्रमात प्रेक्षकांमध्ये कुठेतरी हरवलेले असतात. दादा आहेत की नाही कार्यक्रमात याची शोधाशोध आम्हाला करावी लागते आणि म्हणूनच दादांना जनतेचे नेते म्हणतात. वारंवार त्यांच्या कार्यातून आणि वागणुकीतून हे दिसून येते.

लेटेस्ट न्यूज़