ताज्या बातम्याकोल्हे कुटुंबाच्या पराभवाला महसूल मंत्री विखे जबाबदार :विवेक कोल्हे

कोल्हे कुटुंबाच्या पराभवाला महसूल मंत्री विखे जबाबदार :विवेक कोल्हे

spot_img
spot_img

विखेंच्या गॅरंटीची गरज नाही,आक्रोश मोर्चात कोल्हेचा विखेंना टोला

शिर्डी दि.2 मार्च 2024

Vivek Kolhe on Radhakrushn Vikhe: आम्हाला त्यांच्या गॅरंटीची गरज नाही. राहाता व कोपरगाव तालुक्यातील लोक आमची गॅरंटी घेतील. आम्ही त्यांच्यापेक्षा अधिक भाजपचे काम करतो. आता पक्षानेच आम्हाला मोकळीक द्यावी, असे प्रतिपादन सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले.

निधी वाटपातील दुजाभावाच्या निषेधार्थ आज येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा नेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील कोल्हे गटाच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतीचे सरपंच व पदाधिकारी काळ्या फिती लावून या मोर्चात सहभागी झाले. मोर्चेकरी विखे पाटील आणि कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या निषेधाच्या घोषणा देत होते.

कोपरगावचा दूध संघ त्यांनी हिरावून घेतला. माजी मंत्री कै.शंकरराव कोल्हे विधानपरिषद निवडणुकीत एका मताने पराभूत झाले. माझे वडील बिपीन कोल्हे व आई स्नेहलता कोल्हे यांचा विधानसभा निवडणुकीत थोड्या मतांनी पराभव झाला. याला कारणीभूत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत. संयमाला एक मर्यादा असते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा बॅंकेत गणेश कारखान्याचे मंजूर कर्ज अडवतात.

आमच्या ग्रामपंचायतींना निधी देताना दुजाभाव करतात. यापुढे या अन्यायाच्या विरोधात आंदोलन नव्हे तर राहात्यात तळ ठोकून त्यांच्याविरुद्ध जनतेत असलेल्या असंतोषाचे नेतृत्व करायला आपण क्षणाचाही विलंब लावणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. दिलेला शब्द त्यांनी न पाळल्याने गणेशची निवडणूक झाली. आमचा विजय झाला. गणेशची रिकव्हरी आज जिल्ह्यात सर्वाधिक आहे. दोन लाख मेट्रीक टन उसाचे गाळप होणार आहे, असेही कोल्हे म्हणाले.

यावेळी किसन गव्हाळे, धनंजय जाधव, चंद्रकांत धनवटे, विक्रम पाचोरे, जितेंद्र रणशूर, शिवाजीराव लहारे, साहेबराव रोहोम, भाजपचे तालुकाध्यक्ष कैलास रहाणे, सरपंच संदीप देवकर, अनुराग येवले, कानिफ गुंजाळ आदींची भाषणे झाली. शहराध्यक्ष डी. आर. काले, कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष मनेश गाडे आदींनी दिलेले विविध मागण्यांचे निवेदन निवासी नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांनी स्वीकारले. सूत्रसंचालन दीपक चौधरी यांनी केले. (Latest Marathi News)

 

शेतक-यांवर ज्याचे लक्ष, तोच आपला पक्ष. दिन दुबळ्यांर ज्यांचे लक्ष तोच आपला पक्ष ही आपल्या कामाची पध्दत आहे. कांदा निर्यातीची घोषणा करून पालकमंत्र्यांनी शेतक-यांचे सत्कार स्वीकारले. प्रत्यक्षात निर्यातबंदी उठली नाही. दुधाचे भाव घसरले. अद्यापही अनुदान मिळाले नाही. मिळेल असे वाटत नाही.-

विवेक कोल्हे

लेटेस्ट न्यूज़