Thursday, December 19, 2024

रोड- रोमिओंची आता ‘दक्षता’शी गाठ, सचिनभाऊ जगताप व बनपिंप्री ग्रामस्थांचे धाडसी पाऊल…

अहमदनगर   दि.5 ऑक्टोबर 2023

रोड रोमिओं  ‘अभी बचके रहना रे ‘

रोड रोमिओंच्या त्रासाच्या  अनेक घटना आपण पहात, ऐकत आलोय. कित्येक मुलींचे शाळा, कॉलेज या टवाळखोरांच्या त्रासामुळे बंद झाले. काही मुलींनी- विद्यार्थिनींनी रोड -रोमीओंच्या त्रासाला कंटाळून स्वतःची जीवन यात्रा सुद्धा संपवल्याच्या घटना आहेत. मुलींना शाळा कॉलेजला जाण्यासाठी घरापासून पाच, दहा, वीस किलोमीटर पायपीट करत, एसटीने, सायकलवर असा प्रवास करावा लागतो.

या प्रवासादरम्यान ग्रामीण भागात कोणी विद्यार्थिनींच्या बरोबर असेलच याची खात्री नाही. पालकांनाही दररोज ने- आण करणे, किंवा बरोबर असणे शक्य नसते. आणि याच दरम्यान एकट्या मुलींना पाहून या रोड- रोमिओंचा -टवाळखोरांचा सुळसुळाट होतो. पोलीस प्रशासनाकडून सुद्धा पोलीस कर्मचारी देणे हे फक्त कॉलेजच्या आवारात शक्य आहे. पण कॉलेज ते विद्यार्थिनींचे घर- गाव या ठिकाणापासून दरम्यानचा रस्ता, इकडे सुरक्षा देणे शक्य नसल्याने हि टवाळखोर तीच संधी साधतात. या आणि अशाच घटनांना व  टवाळखोर रोड- रोमिओंना चाप बसवण्यासाठी गावकऱ्यांची एकजूट झाली.

श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंप्री गावाने घेतला धाडसी निर्णय.

जिल्हा परिषद सदस्य सचिन अरुणकाका जगताप यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व बनपिंप्री ग्रामस्थ, यांच्या उपस्थितीत ‘दक्षता’ समिती स्थापन करण्यात आली आहे. दक्षता समितीचे वैशिष्ट्य म्हणजे फक्त गावातील मुलींना -विद्यार्थिनींना नव्हे तर, परिसरातील आठ- दहा गावावरून घोगरगाव व रुईछत्तीसी या ठिकाणी शाळा कॉलेजला जाणाऱ्या सर्व मुलींना ही समिती मदत करणार आहे. मा.सचिनभाऊ जगताप यांचे अध्यक्षतेखाली या दक्षता समितीचे अध्यक्ष म्हणून बनपिंप्री गावचे सरपंच श्री गौतम दिलीप पठारे यांची निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य श्री. बाबासाहेब भाऊसाहेब जगताप यांची निवड करण्यात आली आहे. असाच बनपिंप्री या गावाचा आदर्श इतर गावांनी घेण्याची गरज आहे.

या दक्षता समितीचा उद्देश म्हणजे गावातील मुले व मुली शिक्षण घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय घोगरगाव व जनता माध्यमिक विद्यालय रुईछत्तीशी या ठिकाणी जातात. त्यांना शाळेमध्ये जाण्यास शाळाबाह्य मुलांचा त्रास होतो, या त्रासामुळे बरेचसे पालक आपल्या मुली शाळेमध्ये पाठवत नाहीत. या मुलांना शाळेमध्ये जाण्यास त्रास होऊ नये किंवा मुलींची छेडछाड होऊ नये, या उद्देशाने समितीची स्थापना करण्यात आली आहे. शाळा भरते वेळी व शाळा सुटते वेळी शाळाबाह्य मुले त्या परिसरात येऊन मुलींची छेडछाड करतात, अशा बऱ्याचशा पालकांच्या तक्रारी आल्यामुळे तसेच काहीही कारण नसताना ही मुले त्या परिसरात येऊन थांबतात. अशी मुले शाळेच्या भोवताली वारंवार आढळून आल्यास तरडगव्हाण ,घोगरगाव ,रुईखेल , थिटेसांगवी,चवरसांगवी ,मांदळी, रुईछत्तीसी या परिसरातील नागरिकांनी दक्षता समिती बनपिंपरी यांचेशी संपर्क करावा व आपल्या मुलींना शाळेपासून वंचित ठेवू नये अशी विनंती मा. सचिनभाऊ जगताप यांच्याकडून करण्यात आली आहे. तसेच शाळाबाह्य मुले शाळेच्या परिसरात वारंवार आढळून आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल

मदतीसाठी समितीकडून हे दोन दूरध्वनी क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. फोन नंबर 9420401515 व 9422337554

आणखी महत्वाच्या बातम्या