विक्रमसिंह पाचपुते यांनी दिलेला शब्द पाळला : नागवडे
श्रीगोंदा दि.1 फेब्रुवारी 2024
अनेक वर्षांपासून इनामगाव-वांगदरी-ढोकराई रस्ता चांगला होणे बाबत तेथील ग्रामस्थांकडून मागणी होत होती. परंतु ९ कि.मी. चा हा रस्ता अत्यंत खराब झाला असल्याने मोठ्या निधीची आवश्यकता होती.तसेच कामात काही तांत्रिक अडचणी देखिल होत्या. त्यामुळे या कामासाठी विलंब होत होता. परंतु या सर्व तांत्रिक अडचणीवर मात करून या रस्त्याला भरीव निधी मिळावा यासाठी आ. पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रमसिंह पाचपुते यांच्या प्रयत्नांना यश आले व या रस्त्यासाठी १७ कोटींचा भरीव निधी मंजूर झाला. त्यासाठी विक्रमसिंह पाचपुते यांनी काल्याच्या किर्तनात वांगदरी येथिल कार्यकर्त्यांना व ग्रामस्थांना रस्त्याचे काम लवकर मार्गी लावण्याबाबत दिलेला शब्द आज खऱ्या अर्थाने पूर्ण केला.यामुळे सर्व ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान असल्याची भावना संदिप नागवडे यांनी व्यक्त केली.
वांगदरी गावासाठी, इनामगाव-वांगदरी-ढोकराई रस्ता – १७ कोटी रुपये, रा.मा.५५ ते जाधववस्ती–चोरमलेवाडी रस्ता – ३० लक्ष, तांडावस्ती योजनेअंतर्गत डोमाळेवाडी,चोरमलेवाडी, टूलेवाडी१/२, ढवळेवस्ती, महारनूरवस्ती,भिसे-पारखे वस्ती यांसाठी ४६ लक्ष, विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभामंडप १० लक्ष, अंबिकामाता मंदिर रस्ता करणे- ३० लक्ष व स्ट्रीट लाईट करणे १० लक्ष, अंबिकामाता मंदिर परिसर सुशोभिकरण करणे – ५० लक्ष, मासाळवाडी येथे नविन अंगणवाडी इमारत बांधणे-१२ लक्ष रुपये, वांगदरी पाणीपुरवठा योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत १७.६४ कोटी एवढा भरीव निधी दिल्यामुळे वांगदरी ग्रामस्थांच्या वतीने आ. पाचपुते यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.तसेच खा. सुजयदादा विखे पाटील व युवानेते विक्रमसिंह पाचपुते यांचे जाहिर आभार मानण्यात आले.