अहमदनगर बातम्यादौंड येथे संजय राऊतांचा मराठा आंदोलकांनी ताफा आडवला

दौंड येथे संजय राऊतांचा मराठा आंदोलकांनी ताफा आडवला

spot_img
spot_img

दौंड : आरक्षणासाठी मराठा आंदोलक आक्रमक

दि. 29 ऑक्टोबर 2023

मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचे आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन सुरू आहे.

जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत पुढाऱ्यांना गावात प्रवेश मिळणार नाही, अशी भूमिका अनेक गावकऱ्यांनी घेतली आहे.

छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, अहमदनगर, बीड, नांदेड इत्यादी जिल्ह्यांमध्ये अनेक गावात गाव बंदीचे फलक झळकले आहे. याच पार्श्वभूमीवर दौंड येथे आज खा. संजय राऊतांचा ताफा अडवला आहे. संजय राऊत हे काष्टी येथे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपनेते साजन पाचपुते यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी येत असतानाच दौंड येथे मराठा आंदोलकांनी संजय राऊतांचा ताफा आडवला. यावेळी आंदोलकांनी आम्हाला मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणाही दिल्या.

लेटेस्ट न्यूज़