Saturday, December 21, 2024

पेडगावकरांचा कौल समाजकार्याला ; सरपंच,उपसरपंचपदी ‘यांची’ वर्णी

पेडगावच्या उपसरपंच पदी सौ. योगिता अशोक गोधडे यांची निवड

श्रीगोंदा दि.24 नोव्हेंबर 2023

श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ.योगिता अशोक गोधडे यांची बिनविरोध निवड झाली. ‘त्या’ खासदार सुजय विखे यांचे कट्टर समर्थक अशोक गोधडे यांच्या सौभाग्यवती आहेत. उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया, लोकनियुक्त सरपंच इरफानभाई पिरजादे यांच्या अध्यक्षतेखाली,तर सहाय्यक गट विकास अधिकारी ए.पी.बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणुक ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली.

श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भैरवनाथ जनविकास पॅनल कडून लोकनियुक्त सरपंच होण्याचा मान इरफान भाई पिरजादे यांनी मिळवला. गुरुवारी उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली, यावेळी सौ.योगिता अशोक गोधडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून के.बी.जाधव व एम.जी.झिटे यांनी कामकाज पाहिले. नव्याने निवडून आलेले सरपंच इरफान भाई पिरजादे व उपसरपंच सौ. योगिता गोधडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्व सदस्यांना बरोबर घेऊन गावचा विकास करणार असल्याची ग्वाही दिली.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, माजी उपसरपंच देविदास  शिर्के, सामाजिक कार्यकर्ते शाकुरभाई शेख, सामाजिक कार्यकर्ते अशोक गोधडे, आजमुद्दीन पिरजादे यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या