Wednesday, December 18, 2024

आ. पाचपुते अल्पसंख्यांकांचे नेतृत्व : शकुरभाई शेख

मुस्लिम समाज विक्रम पाचपुते यांच्याबरोबर

श्रीगोंदा : दि.17 नोव्हेंबर 2024

तालुक्यात मुस्लिम समाजाच्या सभागृहासाठी दीड कोटी रुपयांचा निधी दिला तसेच विविध गावात मुस्लिम समाजासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. आमदार बबनराव पाचपुते हे अल्पसंख्याक समाजाचे नेतृत्व आहे. त्यामुळे याही निवडणुकीत मुस्लिम समाज विक्रम पाचपुते यांच्या बरोबर राहणार असल्याचे प्रतिपादन अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष शकुरभाई शेख यांनी पत्रकाव्दारे केले.

 

आमदार बबनराव पाचपुते यांच्या माध्यमातून मागील अडीच वर्षात विक्रम पाचपुते यांनी मोठा प्रमाणात विकास निधी तालुक्यात आणला त्यामध्ये मुस्लिम समाज हा विक्रम पाचपुते यांच्या बरोबर राहणार आहे. शहरातील ईदगाह मैदानावर सभागृहासाठी आमदार बबनराव पाचपुते यांनी दीड कोटी रुपये निधी दिला तसेच तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या मतदार संघात ठिकठिकाणी कब्रस्थान वाल कंपाऊंड, सुशोभीकरण, साठी निधी दिला आहे.

 

महायुती सरकार काळात गेल्या दिड वर्षात मतदार संघात ३० ठिकाणी कब्रस्थान वाल कंपाऊंड सुशोभीकरण साठी निधी दिला. १२ ठिकाणी दर्गाह सभामंडप, रस्ते आदी कामे केली आहेत. त्यामुळे विक्रम पाचपुते यांच्या बरोबर मुस्लिम समाज असणार असल्याचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष शकुरभाई शेख यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या