खोटे कामे करण्यास भाग पाडल्यामुळे ‘त्या’ कुटुंबाचे आमरण उपोषण
श्रीगोंदा दि 9 सप्टेंबर 2024
श्रीगोंदा तालुक्यातील वडाळी गावच्या रहिवासी असलेल्या मीनाक्षी रामदास सकट यांचे पती रामदास सकट हे गेल्या 30 वर्षांपासून अहमदनगर जिल्हा बँकेमध्ये कार्यरत होते. पण रामदास सकट यांचेवर बँक प्रशासनाकडून काही खोटे आरोप लावून खोटी कामे करण्यास त्यांना भाग पाडले व तसे नाही केल्यास तुमची बदली लांब करू अशा धमक्या देण्यात आल्या. त्यांच्यावर सारखा दबाव टाकण्यात आला. त्यांच्या वर दबाव टाकून केलेल्या खोट्या कामांची काही पुरावे सौ मीनाक्षी सकट यांच्याकडे उपलब्ध आहेत. लवकरच प्रसारमाध्यमांसमोर मांडणार आहेत. विश्वासाने व खऱ्या मार्गाने जगण्याची हीच सजा पती रामदास हिराजी सकट यांना मिळाल्याची उद्विग्न प्रतिक्रिया सौ सकट यांनी नगरी पंचशी बोलताना दिली.
या प्रकरणात काही लोकांनी राजकारण तसेच जातीभेद केला. रामदास सकट यांनी खोटी कामे न केल्यास स तुम्हाला खूप पश्चाताप होईल तसेच त्यांची इच्छा नसताना त्यांना शाखा अधिकारी करण्यात आले व खोटे कामे करून घेतली व या खोट्या कामांची शिक्षा म्हणून गेले एक वर्षापासून त्यांना सस्पेंड ऑर्डर दिली. या प्रकरणात 16 लोकांची चौकशी सुरू असताना सुद्धा एकाच मागासवर्गीय समाजातील व्यक्तीला घरी ठेवण्यात आले यातच मोठा जातीभेद दिसून येतो. असे आरोप सौ सकट यांच्याकडून बँक प्रशासनावर करण्यात आले.
अशा एक ना अनेक मागण्यासाठी सकट सह कुटुंबीय 9-9- 2024 वार सोमवार रोजी अहमदनगर जिल्हा सहकारी बँक समोर सर्व कुटुंबासमवेत आत्मदहन करणार असल्याचे कार्यकारी संचालक अहमदनगर जिल्हा सहकारी बँक यांना निवेदनाद्वारे कळविले आहे