विद्यार्थ्यांनी सादर केली साहसी खेळ, कराटे प्रात्यक्षिक आणि भाषण
श्रीगोंदा : दि.20 फेब्रुवारी 2025
शहरात व तालुक्यात शिवजयंती महोत्सव मोठ्या दिमाखात आणि उत्साही वातावरणात पार पडली. सकाळपासूनच शहरात विविध ठिकाणी शिवजयंती साजरी होत होती. चौका-चौकात मिरवणुका निघत श्री छत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.
‘लक्ष्मीनगर’ येथील रहिवाशांनी आपणही आपल्या पारंपारिक सणां पैकी एक सण म्हणून शिवजयंती साजरी करायची व त्याला कौटुंबिक स्वरूप ठेवून जयंतीचे पावित्र्य जपायचे ठरवले अन् दोन दिवसात नियोजन केले. यामध्ये कुठल्याही राजकारणी व्यक्तीला आमंत्रण नाही, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन पुढील पिढीला आपले शिवाजी महाराज माहिती व्हावेत या हेतूने कार्यक्रम घ्यायचे ठरवले .
19 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी पाच वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली.श्री छत्रपती शिवराय माँसाहेब जिजाऊ व मावळे यांच्या वेशभूषेतील शालेय विद्यार्थी गणपती मंदिर लक्ष्मीनगर येथे उपस्थित राहिले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त कृषी उपसंचालक विश्वनाथ दारकुंडे हे होते. तर शिवव्याख्याते खरसडेसर हे प्रमुख वक्ते म्हणून लाभले. बाल शिवप्रेमींसह लक्ष्मीनगर मधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर आपल्या चिमुरड्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी गर्दी केली. यात आनंदकर अकॅडमीचे विद्यार्थी यांनी लाठी-काठी, सेल्फ डिफेन्स यासारखे प्रात्यक्षिक करून दाखवत उपस्थितांचे मने जिंकली.समितीच्या वतीने आनंदकर स्पोर्ट अकॅडमीचे प्रशिक्षक जयेश आनंदकर सर व सिद्धेश आनंदकर सर यांचा सन्मान करण्यात आला.
विशेष म्हणजे या जयंती मध्ये अपेक्षा पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आयोजकांनी कार्यक्रम वेळेत पार पडावा याचा पूर्ण प्रयत्न केला.
प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले खरसडे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की , आपल्याला शिवाजी महाराज समजायचे असतील तर अगोदर ‘चार’ “भ” चा विचार करता आला पाहिजे आणि ते “भ” म्हणजे काय तर भय,भेद, भ्रम आणि भाग्य हे होय.ज्यांना हे चार “भ” समजले त्यांना महाराज समजले. शिवाजी महाराजांचा इतिहास सांगताना विद्यार्थीही मन लावून ऐकताना दिसले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या भाषनाने अध्यक्ष,प्रमुख पाहुण्यांसह पालक वर्ग ही भारावून गेला.
ना राजकारणी ना राजकीय भाषण फक्त शिवरायांचे विचार अशा पद्धतीने शिवजयंतीचे पहिलेच वर्ष अगदी आनंदात व मोठ्या उत्साहात पार पडले
या कार्यक्रमासाठी लक्ष्मीनगर येथील प्रा.ज्ञानदेव भोसले, रवींद्र भोस ,निशांत लोखंडे,रुपेश काळेवाघ,अनिल गिलके,अभिजीत गोडसे, एम.डी शिंदे,शिवाजी मदने, सुनिता सोनवणे, सुनिता गिलके,महेश डोळस, डाॅ.कल्पक,प्रशांत साबळे, केतन राऊत,माणिक सोनवणे यांच्यासह नागरिकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करत कार्यक्रम पार पाडला .
चौकट
आनंदकर स्पोर्ट अकॅडमीची विद्यार्थी भार्गवी शेलार हीने आपल्या भाषणात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर आवाज उठवला ती बोलताना म्हणाली की आम्हाला 50 टक्के आरक्षण नको तर शंभर टक्के संरक्षण हवं हे तिचं बोलणं खरंच विचार करण्यासारखंच होत.