ताज्या बातम्याउद्या नागवडेंचा कार्यकर्ता मेळावा, निर्णयाकडे श्रीगोंदेकरांचे लक्ष...

उद्या नागवडेंचा कार्यकर्ता मेळावा, निर्णयाकडे श्रीगोंदेकरांचे लक्ष…

spot_img
spot_img

नागवडे यांचा वांगदरी येथे मेळावा. 

श्रीगोंदा दि.19 ऑक्टोबर 2024

येत्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद साधून विचार विनिमय करण्याकरिता रविवार ता. २० ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ४ वाजता वांगदरी येथील श्री. अंबिका मातेच्या मंदिरासमोरील पटांगणात कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला असून सदर मेळाव्यास श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांनी केले आहे.

प्रसिद्धी पत्रकात नागवडे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक प्रक्रिया सुरू झालेले आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधून चर्चा व विचारविनिमय करून पुढील निर्णय घेणे करिता वांगदरी येथे आज दुपारी ४ वाजता कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केलेला आहे. सदर मेळाव्यात विधानसभा निवडणुकी संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार असल्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी सदर मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नागवडे यांनी केले आहे.

लेटेस्ट न्यूज़