ताज्या बातम्याराष्ट्रवादीला गळती.... सरपंचासह सोसायटी चेअरमन व संचालकांचा भाजपात प्रवेश

राष्ट्रवादीला गळती…. सरपंचासह सोसायटी चेअरमन व संचालकांचा भाजपात प्रवेश

spot_img
spot_img

राष्ट्रवादीतील या पदाधिकाऱ्यांनी केला भाजपात प्रवेश…!

जामखेड दि.18 नोव्हेंबर 2023

जामखेड : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या कारभाराला कंटाळून अनेक लोकप्रतिनिधी त्यांची साथ सोडू लागले आहेत. राष्ट्रवादीचे युवा नेते प्रशांत शिंदे यांच्यासमवेत जवळा गावचे सरपंच व 10 नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी भाजपात प्रवेश केल्याची घटना ताजी असतानाच रोहित पवारांना आणखीन एक जोरदार धक्का बसला आहे. जामखेड तालुक्यातील कुसडगावाचे सरपंच तसेच सोसायटीचे चेअरमन व संचालकांनी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात सध्या घडत असलेल्या राजकीय घडामोडीतुन आमदार प्रा.राम शिंदे यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ होत असल्याचे दिसू लागले आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित पवारांविरोधात लाट निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नुकत्याच मतदारसंघातील 9 ग्रामपंचायतींच्या निवडणूका पार पडल्या. यामध्ये भाजपने एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले. सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला. या सर्व घडामोडी घडत असतानाच जामखेड तालुक्यातील महत्वाच्या कुसडगांव गावातही आता मोठा राजकीय भूकंप झाला आहे.

कुसडगांव ग्रामपंचायतचे युवा सरपंच अंकुश कात्रजकर तसेच सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन केशव अण्णा कात्रजकर, संचालक निळकंठ कात्रजकर, वसंत कात्रजकर, हनुमंत टिळेकर, युवा नेते धनंजय राऊत, नाना कात्रजकर सह आदींनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीला रामराम ठोकत शुक्रवारी रात्री भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा चोंडी येथे पार पडला. यावेळी आ.प्रा.राम शिंदे साहेब व सभापती पै.शरद कार्ले यांच्या हस्ते सर्वांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

राज्यातील युवकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष यात्रेचे भूत निर्माण करणार्‍या आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघातील युवा नेते त्यांची साथ सोडू लागले आहेत. त्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून तरूण गाव कारभारी मोठ्या प्रमाणात आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भाजपात दाखल होत आहे. गावोगावचे सरपंच उघडपणे बंडाच्या पवित्र्यात आहेत. यावरून रोहित पवारांची पकड आता पुरती सैल झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

आमदार प्रा.राम शिंदे यांनी आपल्या मंत्रिपदाच्या काळात रस्ते, बंधारे, जलसंधारण, सभामंडप, शाळे करिता ब्लॉक अशा विविध विकास कामांसाठी कुसडगांव गावासाठी निधी दिला. तसेच याच काळात कुसडगांवमध्ये राज्य राखीव पोलीस दलाचे केंद्र व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले होते. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच
हे ट्रेनिंग सेंटर कुसडगांवमध्ये निर्माण होत आहे. सध्या त्याचे काम प्रगतीपथावर आहे. याचा गावातील अनेक युवकांना फायदा झाला आहे. रोहित पवार हे आमदार झाल्यापासून कुसडगांवमध्ये कुठल्याही विकास कामांसाठी निधी दिला गेला नाही, जी कामे केली ती अत्यंत निकृष्ट दर्जाची केली. गावचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर आमदार प्रा.राम शिंदे यांच्याशिवाय पर्याय नाही, गावच्या विकासासाठी आम्ही सर्वांनी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला अश्या भावना यावेळी कार्यकर्त्यांनी बोलून दाखवल्या.

जामखेड बाजार समितीचे सभापती पै शरद कार्ले यांच्या पुढाकारातून कुसडगांवमधील पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश घडवून आणण्यात आला. कार्ले यांच्या खेळीमुळे जामखेडच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील अनेक तरूण गावकारभारी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भाजपात प्रवेश करू लागले आहेत. 2019 च्या निवडणुकीत ज्या तरूणांनी रोहित पवारांना डोक्यावर घेतले होते आता तेच तरूण गावकारभारी त्यांची साथ मोठ्या प्रमाणावर सोडताना दिसत आहेत. सध्या घडत असलेल्या राजकीय घडामोडीतून 2024 च्या निवडणुकीची हवा कोणत्या दिशेने वाहणार याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत.

यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस सोमनाथ पाचरणे, पांडुरंग उबाळे, बाजार समितीचे संचालक डाॅ गणेश जगताप, अशोक देवकर, भानुदास अण्णा टिळेकर सोसायटीचे संचालक दिलीप गंभीरे ग्रामपंचायत सदस्य युवराज गंभीरे युवा नेते राम टिळेकर संतोष टिळेकर अशोक गंभीरे विठ्ठल कात्रजकर प्रवीण कार्ले, चंद्रकांत कार्ले, आशिष कार्ले, अमोल कार्ले, बंडू कार्ले, मंगेश कार्ले, शुभम कार्ले, राहुल पवार, नाना कात्रजकर,सागर काकडे, आशिष कार्ले, निलेश कार्ले, भाऊसाहेब कार्ले, आदी उपस्थित होते.

लेटेस्ट न्यूज़