Friday, December 20, 2024

बनपिंप्री येथे १ मे पासून ३ मे पर्यंत श्री. काळभैरवनाथ यात्रा उत्सव सोहळा…

बनपिंप्री येथे १ मे पासून ३ मे पर्यंत श्री. काळभैरवनाथ यात्रा उत्सव सोहळा…

श्रीगोंदा दि.29 एप्रिल 2024

श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंपरी येथील श्री. काळभैरवनाथ यात्रा उत्सव बुधवार दिनांक १ मे पासून शुक्रवार दिनांक ३ मे पर्यंत असुन जि‌.प.सदस्य मा.श्री. सचिनभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती सरपंच गौतमराव पठारे यांनी दिली आहे.

 

कालभैरवनाथ यात्रा उत्सव निमित्त विविध धार्मिक व मनोरंजन कार्यक्रम…

बुधवार दिनांक १ मे रोजी

सकाळी ९ वाजता श्री.भैरवनाथ कावडी मिरवणूक सोहळा तसेच संध्याकाळी विविध धार्मिक कार्यक्रम व देवाचे लग्न आणि छबीना

 

गुरुवार दिनांक २ मे रोजी

सायंकाळी ५ वाजता जंगी कुस्त्यांचा *हगामा* आणि संध्याकाळी ९ ते २ मा. प्रकाश आहिरेकर सह मा. निलेशकुमार आहिरेकर यांचा संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेला नंबर १ लोकनाट्य तमाशा

शुक्रवार दिनांक ३ मे रोजी

संध्याकाळी ९ ते १२ तनिष्का ग्रुप प्रस्तूत स्वरम म्युझिकल ऑर्केस्ट्रा

आणखी महत्वाच्या बातम्या