स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने सकट यांना पुरस्कार
श्रीगोंदा दि.26 डिसेंबर 2023
सुरोडी गावच्या सरपंच सौ. मीनाक्षी आर सकट यांना आदर्श सरपंच पुरस्कार नुकताच मिळाला त्याबद्दल तालुक्याभरातून त्यांचे हार्दिक अभिनंदन केले जात आहे सौ. सकट ह्या गेल्या 3 वर्षापासून सरपंच आहेत. त्यांच्या कामाची पोहोच म्हणून त्यांना हा सन्मान बहाल करण्यात आला.सूरोडी सारख्या छोट्या गावात राहून सुद्धा त्यांनी अनेक नवनवीन उपक्रम राबवले.
आमदार खासदार ग्रामविकास मंत्री तसेच पाणी मंत्री अशा अशा सर्वांशी भेटून गवासाठी अनेक कामे मागितली व त्याचा पाठपुरावा करत गावाच्या विकासात भर व त्यांच्या या पाठपुराव्याला अनेक कामाच्या स्वरूपात यश आले. पाण्यासारखा गंभीर प्रश्न त्यांनी अगदी सहज सोडवला.तसेच मागासवर्गीय वस्तीत कटे काढून तेथे शौचालय उभे केले पिण्याची पाण्यासाठी अनेक ठिकाणी बोर घेतले .अशा अनेक कामातून त्यांना गावची साथ मिळाली. त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला.
परंतु सौ.सकट म्हणल्या,की हा पुरस्कार माझा एकठीचा नसून माझ्या गावाचा आहे. याच स्वभावामुळे त्या तालुक्यात सर्वत्र परिचित आहेत.त्यांना या अगोदर ही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. या सन्मानामुळे नगरीपंच कडूनही त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा