ताज्या बातम्याडॉ. भास्कर मोरेंवर विनयभंगाचा गुन्हा : कुलगुरू येईपर्यंत विद्यार्थी उपोषणावर ठाम

डॉ. भास्कर मोरेंवर विनयभंगाचा गुन्हा : कुलगुरू येईपर्यंत विद्यार्थी उपोषणावर ठाम

spot_img
spot_img

डॉ.मोरेंवर यापूर्वीही विनयभंगाचा गुन्हा,विद्यार्थी उपोषणावर ठाम

जामखेड दि.9 मार्च 2024

रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी गेल्या चार दिवसांपासून सुरू केलेल्या आंदोलनामुळे अखेर रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्यावर आज (शुक्रवारी) विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीत म्हटले आहे, की डॉ. मोरे यांनी पीडित मुलीस कॉलेजच्या प्रिन्सिपल ऑफिसमध्ये बोलावले. ऑफिसच्या अँंटी चेंबरमध्ये तिच्याशी अश्लील चाळे केले व विनयभंग केला.

दरम्यान, विद्यार्थी व जामखेडमधील विविध संघटनांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकांत वाखारे, पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक वर्षा जाधव तपास करीत आहेत.

डॉ. मोरेंवर यापूर्वीही विनयभंगाचा गुन्हा रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटर, रत्नापूरचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्या विरोधात मागील वर्षीही कॉलेजमधील मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कुलगुरू येईपर्यंत..

प्रशासनाकडून आंदोलनाची दखल घेत मुलींच्या तक्रारीसाठी महिला सहायक पोलिस निरीक्षकांची नियुक्ती केली होती. तरी विद्यार्थी डॉ. भास्कर मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यावर ठाम होते. अखेर रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू उपोषणस्थळी येईपर्यंत उपोषण सुरूच राहील, असा निर्धार विद्यार्थ्यांनी बोलून दाखविला.

विविध संघटना विद्यार्थ्यांच्या आंदोलनात

डॉ. भास्कर मोरे यांच्या विरोधात गेल्या चार दिवसांपासून शेकडो विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुराजे भोसले व संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत हे देखील विद्यार्थ्यांसमवेत उपोषणास बसले आहेत. उपोषणस्थळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व रिपब्लिकन पक्ष जामखेड तालुका वकील संघ यांनीदेखील जाहीर पाठिंबा दिला आहे.

डॉ.मोरेंवर यापूर्वीही विनयभंगाचा गुन्हा

रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटर, रत्नापूरचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्या विरोधात मागील वर्षीही कॉलेजमधील मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

लेटेस्ट न्यूज़