खासदार विखेंच्या स्थानिक विकास निधीतून शहरातील विकास कामांसाठी भरघोस निधी
अहमदनगर दि 19 नोव्हेंबर 2023
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून अहमदनगर शहरातील विकास कामांकरिता भरघोस निधी प्राप्त झाला आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये खासदार निधीतून ९० लक्ष आणि पर्यटन विकास मधून ५० लक्ष असा एकूण ०१ कोटी ४० लक्ष रुपयांचा भरीव निधी विविध ठिकाणी सभामंडपाच्या बांधकामांसाठी मंजूर करून दिल्याबद्दल अहमदनगरवासियांनी खासदार सुजय विखेंचे आभार मानले आहेत.
खासदार निधीतून प्रभाग क्र. २ येथील वैष्णवी माता मंदिर, प्रभाग क्र. ७ मधील विजयनगर येथे मारुती मंदिर परिसर, प्रभाग क्र. ८ मध्ये दातरंगे मळा येथील पर्जन ईश्वर महादेव मंदिर परिसर, प्रभाग क्र. ५ मध्ये समता चौक येथील हनुमान मंदिर व महादेव मंदिर परिसर, प्रभाग क्र. ९ मध्ये सिद्धी बागेतील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसर, प्रभाग क्र. १६ मध्ये शिवाजीनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, प्रभाग क्र. १६ मध्ये ओंकार नगर येथील हनुमान मंदिर, प्रभाग क्र. १६ मध्ये विश्वनराजे मराठा मंदिर, प्रभाग क्र. १७ मध्ये शास्त्रीनगर येथील श्री दत्त मंदिर, प्रभाग क्र. १७ मध्ये मोहिनीनगर येथील श्री गणपती मंदिर आदी ठिकाणी आणि पर्यटन विकास मधून प्रभाग क्र. १६ मध्ये बालाजी कॉलनी येथील श्री स्वामी समर्थ मंदिर, प्रभाग क्र. १६ मध्ये पाच गोडाऊन येथील दत्त मंदिर, प्रभाग क्र. १७ मध्ये एकता कॉलनी देवी रोड येथील गणपती मंदिर, प्रभाग क्र. १७ मध्ये मोहिनी नगर पाण्याची टाकी येथील हनुमान मंदिर, प्रभाग क्र. १७ मध्ये शास्त्रीनगर येथील हनुमान मंदिर आदी ठिकाणी सभामंडप बांधकाम करणेसाठी सदरील निधी मंजूर झाला आहे.
या आभार कार्यक्रमाप्रसंगी बोलताना सुजय विखे यांनी एक लोकप्रतिनिधी या नात्याने विविध विकासकामांसाठी सदैव कटिबध्द असून यापुढेही अशा अनेकविध कामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्नशील भूमिका पार पाडेल असे सांगून उपस्थित सर्वांचे आभार मानले.
याप्रसंगी जिल्हा शहराध्यक्ष अभय आगरकर,नगर द लोकसभा प्रमुख बाबासाहेब वाकळे, अहमदनगर विधानसभा निवडणूक प्रमुख भैया गंधे युवा मोर्चाध्यक्ष मयूर बोचुघोळ ,महिला शहराध्यक्ष प्रिया जानवे, ओबीसी सेल अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, प्रदेश कार्यकारणी सदस्य विवेक नाईक व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.